IPL 2021 : भर मैदानात प्रपोज; कोण आहे दीपक चहरची गर्लफ्रेंड? जाणून घ्या…

मुंबई तक

• 04:08 PM • 07 Oct 2021

IPL 2021 च्या चौदाव्या हंगामातला थरार शेवटच्या दिवसापर्यंत सुरुच आहे. चेन्नईच्या संघाविरूद्ध पंजाबने अवघ्या १३ षटकात सामना निकालात काढला. चेन्नईने २० षटकात ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर दीपक चहरने स्टँडमध्ये जाऊन एका तरुणीला प्रपोज करत तिचा […]

Mumbaitak
follow google news

IPL 2021 च्या चौदाव्या हंगामातला थरार शेवटच्या दिवसापर्यंत सुरुच आहे. चेन्नईच्या संघाविरूद्ध पंजाबने अवघ्या १३ षटकात सामना निकालात काढला. चेन्नईने २० षटकात ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर दीपक चहरने स्टँडमध्ये जाऊन एका तरुणीला प्रपोज करत तिचा होकार मिळवला.

हे वाचलं का?

दीपक चहरच्या या रोमँटीक अंदाजाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गुडघ्यावरुन बसून दीपक चहरने प्रपोज केलेली ती मुलगी आहे तरी कोण अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे जया भारद्वाज. गेल्या काही दिवसांपासून जया आणि दीपक डेट करत होते, अखेरीस दोघांनीही आपल्या रिलेशनशीपला एक वेगळा आकार दिला आहे.

पंजाबविरुद्ध सामना गमावला असला तरीही दीपकच्या या प्रपोजलनंतर दोघांचंही टीमच्या हॉटेलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

जया दिल्लीच्या एका कार्पोरेट कंपनीत नोकरी करते. मात्र, ती सोशल मिडियावर फारशी अँक्टिव्ह नसते. MTV Splitsvilla च्या दुसऱ्या सीझनचा विजेता आणि ‘बिग बॉस 5’ फेम सिद्धार्थ भारद्वाज याची ती छोटी बहिण आहे. सिद्धार्थ मॉडेल आणि व्हिडीओ जॉकीदेखील आहे. त्याची जया लहाण बहिण आहे.

Video : She said Yes ! चेन्नईच्या दीपक चहरने सामना संपल्यावर केलं गर्लफ्रेंडला प्रपोज

    follow whatsapp