IPL 2022 : बीसीसीआयकडून retention policy जाहीर, प्रत्येक संघाला ४ खेळाडूंना कायम राखण्याची संधी

मुंबई तक

• 02:29 PM • 30 Oct 2021

आयपीएलचा चौदावा हंगाम नुकताच युएईत पार पडल्यानंतर BCCI ने त्वरित पुढच्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. २०२२ साली आयपीएलचं मेगा ऑक्शन पार पडणार असून पुढील वर्षापासून आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ सहभागी होणार आहेत. या संघांसाठीचा लिलाव नुकताच दुबईत पार पडला. मेगा ऑक्शनआधी बीसीसीआयने सर्व संघासाठी retention policy जाहीर केली आहे. ज्यामध्ये सध्याच्या […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलचा चौदावा हंगाम नुकताच युएईत पार पडल्यानंतर BCCI ने त्वरित पुढच्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. २०२२ साली आयपीएलचं मेगा ऑक्शन पार पडणार असून पुढील वर्षापासून आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ सहभागी होणार आहेत. या संघांसाठीचा लिलाव नुकताच दुबईत पार पडला.

हे वाचलं का?

मेगा ऑक्शनआधी बीसीसीआयने सर्व संघासाठी retention policy जाहीर केली आहे. ज्यामध्ये सध्याच्या ८ संघांना ४ खेळाडूंना कायम राखण्याची संधी मिळणार आहे, तर उर्वरित दोन संघांना ऑक्शन पूलमधील ३ खेळाडूंना कायम राखण्याची संधी मिळणार आहे. ४ खेळाडूंपैकी ३ खेळाडू हे भारतीय तर उर्वरित १ खेळाडू हा परदेशी असणार आहे, किंवा कोणताही संघ २ भारतीय आणि २ परदेशी खेळाडूंनाही कायम राखू शकणार आहे.

2 New Teams in IPL: एका टीमसाठी ७ हजार ९० कोटी रक्कम मोजणारे संजीव गोएंका कोण आहेत? जाणून घ्या…

नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद आणि लनखऊ संघांसाठीही नियम आखून देण्यात आले आहेत. जर ऑक्शन पूलमध्ये भारताचे स्टार खेळाडू उतरले नाहीतर तर नव्याने आलेले दोन संघ ३ पैकी २ परदेशी खेळाडू रिटेन करु शकतात. तसेच आगामी हंगामात राईट टू मॅच हा पर्याय संघांना उपलब्ध होणार नाहीये. बीसीसीआयने हे नवीन नियम सर्व संघमालकांना पाठवले आहेत. प्रत्येक संघाला आगामी लिलावासाठी ९० कोटींची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे आगामी हंगामात कोणता खेळाडू कोणत्या संघाकडे जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

2 New Teams in IPL : अदानी उद्योग समुहाला शर्यतीबाहेर करणारा CVC Capitals ग्रूप आहे तरी कोण?

    follow whatsapp