IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला दिलासा, खेळाडूची RTPCR टेस्ट निगेटीव्ह

मुंबई तक

• 11:26 AM • 18 Apr 2022

कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे संपूर्ण संघाला क्वारंटाईन करावं लागलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला दिलासा मिळाला आहे. ज्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं, त्याची RTPCR टेस्ट निगेटीव्ह आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजीओ पॅटट्रीक फराहत यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खेळाडूंना क्वारंटाइन करुन त्यांची चाचणी घेण्यात आली होती. या अँटिजेन चाचणी एका […]

Mumbaitak
follow google news

कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे संपूर्ण संघाला क्वारंटाईन करावं लागलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला दिलासा मिळाला आहे. ज्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं, त्याची RTPCR टेस्ट निगेटीव्ह आली आहे.

हे वाचलं का?

दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजीओ पॅटट्रीक फराहत यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खेळाडूंना क्वारंटाइन करुन त्यांची चाचणी घेण्यात आली होती. या अँटिजेन चाचणी एका खेळाडूला कोविडची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. परंतू या खेळाडूचा RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. दिल्लीच्या संघाने पंजाबविरुद्ध सामन्यासाठी आपला पुणे प्रवास रद्द करुन स्वतःला क्वारंटाइन केलं आहे.

IPL 2022 : इशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबई इंडियन्सची चूक – शेन वॉटसन

दरम्यान, बीसीसीआय दिल्लीच्या संघाच्या मदतीसाठी आपलं वेगळं वैद्यकीय पथक पाठवणार असल्याचं कळतंय. आताच्या घडीला बुधवारी होणाऱ्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नसल्याचं कळतंय. सर्व खेळाडूंची दुसरी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारच्या सामन्यासाठी प्रवासाची परवानगी मिळणार आहे.

पुढच्या वर्षापासून प्रेक्षकांसाठी महिला IPL सामन्यांची पर्वणी – BCCI सूत्रांची माहिती

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर मागच्या वर्षी बीसीसीआयला मध्यावधीच स्पर्धा स्थगित करावी लागली होती. यंदा स्पर्धेला कोरोनाचा फटका बसू नये यासाठी बीसीसीआयने मुंबई आणि पुणे या दोन शहरांत स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

उमरान मलिकची हवा, 20 वी ओव्हर मेडन टाकत दिग्गज बॉलर्सशी बरोबरी

    follow whatsapp