IPL च्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलचचा इतिहास पाहिला तर मुंबईचा संघ हा नेहमी स्लो सुरुवातीसाठी ओळखला जातो. अनेकदा लागोपाठ सामने हरल्यानंतरही मुंबईने दमदार पुनरागमन करत स्पर्धेत बाजी मारली आहे. परंतू यंदाचं वर्ष मुंबई इंडियन्ससाठी खडतर जाताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
2014 च्या हंगामात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची अशीच अवस्था झाली होती. परंतू यानंतरही मुंबईने आपल्या उर्वरित 9 पैकी 7 सामने जिंकत प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामातील खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सचा संघ असा चमत्कार पुन्हा घडवू शकेल का असं विचारलं जातंय.
IPL 2022 MI : मुंबई इडियन्सच्या खेळाडूंना नीता अंबानी फोन करून काय म्हणाल्या?
पंजाबविरुद्ध सामन्यात मुंबईला 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे हेडकोच महेला जयवर्धनेने संघाचा महत्वाचा खेळाडू जोफ्रा आर्चरचं नसणं चांगलंच महागात पडत असल्याचं बोलून दाखवलं. “अर्थातच, लिलावात आम्ही बॉलिंगच्या दृष्टीकोनातून केलेली सर्वोत्तम खरेदी ही जोप्रा आर्चर होता. परंतू जोफ्रा यंदाच्या हंगामात खेळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्हाला खूप कठीण जातं आहे, परंतू तरीही आम्ही संघाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहोत.”
मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात डॅनिअल सम्स, टायमल मिल्स या खेळाडूंना संधी देऊन प्रयत्न केला, परंतू त्यांना यश आलेलं नाही. डॅनिअल सम्स तर मुंबई इंडियन्ससाठी इकोनॉमी रेटच्या दृष्टीने सर्वात खराब गोलंदाज ठरला आहे. मिल्सही त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करु शकलेला नाहीये. भारतीय बॉलर्समध्ये बसिल थम्पी, जयदेव उनाडटक यासारखे पर्याय मुंबई इंडियन्सकडे आहेत परंतू त्यांनाही खास कामगिरी करुन दाखवता आलेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा सगळा भार हा एकट्या जसप्रीत बुमराहवर पडलेला दिसत आहे.
RCB ट्रॉफी जिंकेपर्यंत लग्न करणार नाही, मॅचदरम्यान व्हायरल झालेली ‘ती’ मुलगी निघाली नाशिकची
या खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स कमबॅक करु शकेल का? Mumbai Indians ला जर यंदाचे प्ले-ऑफ खेळायचे असतील तर त्यांना संघात काही बदल करणं गरजेचं आहे. सध्याचं टीम कॉम्बिनेश अपेक्षित निकाल देत नसल्यामुळे राखीव खेळाडूंपैकी फॅबिअन अॅलनला संधी देण्यात येऊ शकते. कायरन पोलार्ड सध्या खराब फॉर्मशी झुंज देतोय, त्यामुळे त्यालाही विश्रांती देता येऊ शकते. परंतू पोलार्ड सारख्या खेळाडूला संघातून डावलणं मुंबईला महागातही पडू शकतं.
स्टार IPL खेळाडूंच्या ग्लॅमरस पत्नी
स्पर्धेची सुरुवात अतिशय खराब पद्धतीने करण्याची मुंबईची ही पहिलीच वेळ नाही. परंतू यंदाच्या हंगामात मुंबईने ऑक्शनमध्ये योग्य खेळाडूंची निवड केली नाही असा सूर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर लावला होता. त्यामुळे आता उरलेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स काही चमत्कार करुन दाखवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT