IPL 2022 : Thala is Back ! तब्बल २ वर्षांनी धोनीचं आयपीएलमध्ये अर्धशतक

मुंबई तक

• 04:25 PM • 26 Mar 2022

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या सलामीच्या सामन्यात KKR च्या बॉलर्सनी धडाकेबाज कामगिरी केली. चेन्नईचा संघ अडचणीत सापडलेला असताना महेंद्रसिंह धोनीने आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परत खणखणीत अर्धशतक झळकावलं. आयपीएलमध्ये तब्बल २ वर्षांच्या कालावधीनंतर धोनीने अर्धशतक झळकावलं आहे. २०१९ च्या आयपीएलमध्ये धोनीने RCB विरुद्ध अर्धशतक […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या सलामीच्या सामन्यात KKR च्या बॉलर्सनी धडाकेबाज कामगिरी केली. चेन्नईचा संघ अडचणीत सापडलेला असताना महेंद्रसिंह धोनीने आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परत खणखणीत अर्धशतक झळकावलं.

हे वाचलं का?

आयपीएलमध्ये तब्बल २ वर्षांच्या कालावधीनंतर धोनीने अर्धशतक झळकावलं आहे. २०१९ च्या आयपीएलमध्ये धोनीने RCB विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर धोनीने अनेक विक्रमही नोंदवले.

५ बाद ६१ अशा बिकट परिस्थितीत चेन्नईचा संघ अडकलेला होता. यावेळी धोनीने कर्णधार रविंद्र जाडेजाच्या साथीने संघाचा डाव सावरला. धोनीने ३८ बॉलमध्ये ७ फोर आणि १ सिक्स लगावत नाबाद ५० रन्स केल्या.

धोनीला फॉर्मात आलेलं पाहून सोशल मीडियावरही माजी खेळाडूंसह त्याच्या चाहत्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून उमेश यादवने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये महत्वाच्या दोन विकेट घेत चेन्नईच्या डावाला खिंडार पाडलं होतं. चेन्नईचा संघ १०० धावा तरी पूर्ण करु शकेल की नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. परंतू धोनीने आपला सर्व अनुभव पणाला लावत चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

    follow whatsapp