ADVERTISEMENT
इंडियन प्रीमियर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर झालंय. 31 मार्च 2023 पासून IPL ला सुरूवात होईल.
पहिला ओपनिंग सामना चेन्नई सुपर किंग्ज, डिफेंडिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.
गुजरात टायटन्स टीमने गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला होता.
यंदाच्या लीगमध्ये 52 दिवस एकूण ७० सामने खेळले जाणार आहेत.
त्याचवेळी, सीझनमधील पहिला डबल हेडर सामना 1 एप्रिल रोजी खेळला जाईल.
आयपीएल इतिहासात 6 मे 2023 हा मोठा दिवस असणार आहे. या दिवशी 1000 वा सामना खेळला जाणार आहे.
सर्व 10 टीम्सना दोन गटात विभागलं गेलंय. पहिल्या गटात कोलकाता, राजस्थान, मुंबई, दिल्ली आणि लखनौची टीम आहे.
दुसऱ्या गटात गुजरात, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि पंजाबची टीम आहे.
IPL सीझनचा शेवट 28 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाईल.
ADVERTISEMENT