IPL 2023, mumbai indians : गुजरातवर विजय, पण मुंबई प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार?

मुंबई तक

13 May 2023 (अपडेटेड: 13 May 2023, 07:24 AM)

मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव केला. त्यामुळे मुंबईचे एकूण गुण 14 झाले आहेत. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कमीत कमी 16 गुणांची गरज आहे. त्यामुळे पुढील सामन्यांवर नजर असणार आहे.

Can MI qualify for IPL 2023? IPL 2023 Playoff Scenarios

Can MI qualify for IPL 2023? IPL 2023 Playoff Scenarios

follow google news

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या चालू 2023 हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी चांगली झाली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर सूर्यकुमार यादवचा फॉर्म परत येताच, मुंबईने ‘फास्ट लोकल’प्रमाणे वेग वेगात पकडला आणि आता प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मुंबईने गुजरातविरुद्ध 218 धावा केल्यानंतर 27 धावांनी विजय मिळवत प्ले ऑफच्या दिशेने दमदार वाटचाल केली. आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, आयपीएल 2023 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता मुंबईला काय करावे लागणार? हेच समजून घेऊयात…

हे वाचलं का?

मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जायचं असेल, तर काय आहे समीकरण?

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाले तर पहिले दोन सामने गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने टीमने पुढील 9 सामने खेळताना 6 सामने जिंकले आहेत. म्हणजेच आतापर्यंत मुंबई संघाने 12 सामन्यांत सात विजय नोंदवले आहेत. त्यामुळे मुंबईचे 14 गुण झाले आहेत.

हेही वाचा >> मुंबई इंडियन्सला मोठा झटका, जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर

मुंबईला आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 16 गुणांची गरज आहे आणि त्यासाठी उरलेल्या दोन सामन्यांमध्ये विजयाचे वेध लागले आहेत. मुंबईने दोनपैकी एक सामना जिंकल्यास ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. पण मुंबई बरोबरच आरसीबी, राजस्थान आणि पंजाब किंग्ज देखील 16 गुणांवर टूर्नामेंट संपवू शकतात.

हेही वाचा >> Rohit Sharma : …तर रोहित शर्मा बाद झालाच नसता, 3M चा नियम काय सांगतो?

त्यामुळे 16 गुण झाले तरी मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजे खुले होतीलच असं नाही. आता रोहितच्या संघाला त्यामुळे अधिक चांगला खेळ करून प्लेऑफसाठी पात्र ठरायचे आहे. त्यानंतर त्यांना आगामी दोन्ही सामने जिंकून 18 गुण पूर्ण मिळवावे लागतील. त्यामुळे मुंबई टॉप-2 मध्येही पोहोचू शकते.

    follow whatsapp