Champions Trophy 2025 : टीम इंडियाला धक्का! पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यातून भारताचा हुकमी एक्का बाहेर?

Champions Trophy 2025 : टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरोधात होणाऱ्या सामन्यातून हुकमी एक्का बाहेर? मोठी अपडेट आली समोर बॉर्डर गावस्कर सीरिजच्या शेवटच्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती.

ICC Champions Trophy 2025, Jasprit Bumrah

ICC Champions Trophy 2025, Jasprit Bumrah

मुंबई तक

• 03:05 PM • 12 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर

point

'या' तारखेला रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला

point

'या' तारखेला होणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनलचा सामना

Champions Trophy 2025 : टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरोधात होणाऱ्या सामन्यातून हुकमी एक्का बाहेर? मोठी अपडेट आली समोर
बॉर्डर गावस्कर सीरिजच्या शेवटच्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. पाठीत दुखत असल्याने बुमराहने शेवटचा कसोटी सामना पूर्ण होण्याआधीच मैदानातून बाहेर गेला होता. त्याच्या दुखापतीमुळे भारताला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे भारताला शेवटचा कसोटी सामना गमवावा लागला. दरम्यान, बुमराहच्या दुखापतीबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप मॅचमधून बाहेर राहू शकतो.

हे वाचलं का?

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बुमराह पूर्णपणे फिट होण्याची आशा आहे. रिपोर्टनुसार, बुमराह फिटनेससाठी एनसीएत जाणार आहे. बुमराहला फ्रॅक्चर नसल्याचं सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. पण त्याच्या पाठीला सूज आहे. यासाठी एनसीए बुमराहच्या रिकव्हरीकडे लक्ष देईल आणि बुमराह तीन आठवडे एनसीएत राहणार असल्याचं समजते. परंतु, त्यानंतरही बुमराहला एक किंवा दोन सामने खेळावे लागतील. जरी ते बुमराहच्या फिटनेसाठीचे सराव सामने असले, तरी बुमराहला ते सामने खेळावे लागतील.

हे ही वाचा >> Suresh Dhas : "दलित समाजाचा सरपंच, जागेवर खात्मा केला गेला...", बीड सरपंच अपघातावर काय म्हणाले धस?

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान विरोधात होणाऱ्या सामन्यामध्ये बुमराह खेळणार नाही, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला दुबईत सामना होणार आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, बुमराह फिट होण्यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा वेळ लागू शकतो. म्हणजेच बुमराह पाकिस्तान विरुद्ध 22 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्याला मुकणार आहे. 

हे ही वाचा >> Beed Sarpanch Accident : राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडवलं, बीडमध्ये पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू, अपघात की...

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताची शेवटची ग्रुप मॅच न्यूझीलंड विरुद्ध 2 मार्चला रंगणार आहे. बुमराह या सामन्यात खेळेल की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीय. याआधी भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेश आणि 23 फेब्रुवारीला पाकिस्तान विरोधात खेळणार आहे. भारत सर्व सामने दुबईत खेळणार आहे. कारण टीम इंडियाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे आयसीसीने हायब्रिड मॉडेलनुसार भारताचे सामने दुबईत आयोजित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीचा सेमीफायनलचा सामना 4 आणि 5 मार्चला आणि फायनलचा सामना 9 मार्चला रंगणार आहे.

    follow whatsapp