IPL 2021 : जोश हेजलवूडची माघार, CSK ला धक्का

मुंबई तक

• 02:24 AM • 01 Apr 2021

आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होण्याआधीच महत्वाच्या खेळाडूंच्या माघारीचं सत्र सुरु झालं आहे. सनराईजर्स हैदराबादच्या मिचेल मार्शने खासगी कारण देऊन यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूडनेही यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. हेजलवूड आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करतो. Bio Secure Bubble चं कारण देऊन हेजवूडने माघार घेतली आहे. IPL 2021 : स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियन प्लेअरची माघार, […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होण्याआधीच महत्वाच्या खेळाडूंच्या माघारीचं सत्र सुरु झालं आहे. सनराईजर्स हैदराबादच्या मिचेल मार्शने खासगी कारण देऊन यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूडनेही यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. हेजलवूड आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करतो. Bio Secure Bubble चं कारण देऊन हेजवूडने माघार घेतली आहे.

हे वाचलं का?

IPL 2021 : स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियन प्लेअरची माघार, SRH च्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडूची एंट्री

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळातही Bio Secure Bubble वातावरणात आंतरराष्ट्रीय आणि टी-२० लिग स्पर्धांना सुरुवात झाली. या Bio Secure Bubble मध्ये खेळाडूंना बाहेरील लोकांशी संवाद साधण्याचा किंवा त्यांना भेटण्याची परवानगी नसते. पण या वातावरणाचा खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे हेजलवूडने माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना फ्रेश राहण्यासाठी आणि थोडावेळ आपल्या परिवारासोबत राहण्यासाठी हेजलवूड यंदाचं आयपीएल खेळणार नाहीये.

“गेल्या १० महिन्यांपासून मी Bio Secure Bubble मध्ये आहे, जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये मी क्वारंटाइन होऊन क्रिकेट खेळतो आहे. त्यामुळे आता मी थोडासा आराम करायचं ठरवलं आहे. येणाऱ्या दोन महिन्यांत ऑस्ट्रेलियात महत्वाच्या सिरीज आहेत…त्यासाठी मला तयार रहायचं आहे. ऑस्ट्रेलियाला पुढे अनेक सिरीज खेळायच्या आहेत. वेस्ट इंडिज, बांगलादेशच्या संघासोबत आम्हाला सिरीज खेळायची आहे. याचसोबत अॅशेस सिरीज आणि टी-२० वर्ल्डकप देखील याच वर्षी आहे. त्यामुळे या स्पर्धांमध्ये खेळायचं असेल तर मला शाररिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहणं गरजेचं आहे.” हेजलवूडने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटशी बोलताना माहिती दिली.

IPL 2021 : ऋषभ पंतच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, नवीन सिझनमध्ये करणार दिल्लीचं नेतृत्व

    follow whatsapp