ADVERTISEMENT
केएल राहुल मागील अनेक दिवसांपासून धावा काढण्यासाठी सतत धडपडत आहे.
गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच २०२२ पासून केएल राहुल अत्यंत खराब फॉर्मशी झगडत आहे.
30 वर्षीय राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत उपकर्णधार बनवण्यात आले आहे, मात्र पहिल्या दोन सामन्यात त्याने निराशा केली आहे.
केएल राहुलला तीन डावात केवळ 38 धावा करता आल्या आहेत.
मात्र अद्यापही कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा केएल राहुलवर पूर्ण विश्वास आहे.
दिल्ली कसोटी 6 गडी राखून जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या कामगिरीकडे पाहत नाही, तर संपूर्ण संघ म्हणून पाहतो.
तर द्रविड म्हणाला की, अशी परिस्थिती कोणत्याही खेळाडूवर येऊ शकते. त्याची मागील कामगिरी आपण विसरता कामा नये. आम्ही राहुलला सपोर्ट करत राहू.
ADVERTISEMENT