Abhishek Sharma Cricket Career And Net Worth : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात रंगलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी करत 37 धावांत शतक ठोकलं. विशेष म्हणजे अभिषेक 17 चेंडूत सर्वात वेगवान अर्थशतक ठोकणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने 13 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीनं वानखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडला. अनेक विक्रमांना गवसणी घातल्याने अभिषेक शर्माची क्रिकेटविश्वात तुफान चर्चा रंगलीय.
ADVERTISEMENT
24 वर्षांच्या अभिषेकला टीम इंडियाचा फ्यूचर स्टार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिषेकने टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वात मोठी शतकी खेळी केल्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याने 54 चेंडूत 135 धावा करून टीम इंडियाला 150 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे चाहत्यांना अभिषेक शर्माच्या करिअरबाबत जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंजाबचा अभिषेक शर्मा किती संपत्तीचा मालक आहे? जाणून घेऊयात..
अभिषेक शर्माची वैयक्तिक माहिती
- पूर्ण नाव - अभिषेक शर्मा
- जन्मदिन - 4 सप्टेंबर 2000
- वय - 24 वर्ष आणि 152 दिवस
- कुठे जन्म झाला - अमृतसर (पंजाब)
- उंची - 5 फूट 7 इंच
- शिक्षण - दिल्ली पब्लिक स्कूल, अमृतसर
- माता-पिता - राजकुमार शर्मा, मंजू शर्मा
- बहीण/भाऊ - कोमल शर्मा
हे ही वाचा >> 'संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालेल तो नालायक ठरेल', वड्डेटीवारांची जहरी टीका
अभिषेक शर्माने घरेलू क्रिकेटमध्ये पंजाबसाठी आणि आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी टॉप ऑर्डरमध्ये जागा बनवली. अभिषेक डावखुरा फिरकीपटूही आहे. त्याच्याकडे बॅकस्पिनिंग लेगकटर चेंडू फेकण्याचं विशेष कौशल्य आहे. सर्वात आधी 2015-16 मध्ये विजय मर्चेंट अंडर-16 टूर्नामेंटमध्ये अभिषेक शर्मा टॉप रन-स्कोरर होता. यादरम्यान अभिषेकने 7 सामन्यांमध्ये 1200 धावा केल्या आहेत.
तसच अंडर 19 आशिय चषकातही अभिषेकने चमकदार कामगिरी केलीय. अभिषेक 2018 च्या अंडर-19 वर्ल्डकप विजेत्या संघातही सामील होता. त्याने क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेश विरुद्ध 50 धावा करून 2 विकेट घेण्याची अप्रतिम कामगिरीही केली होती.त्यानंतर दिल्ली डेयरडेविल्सने अभिषेकला 2018 च्या आयपीएल ऑक्शनमध्येही खरेदी केलं. पहिल्या आयपीएल सामन्यात अभिषेकने 19 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. त्यानंतर वर्ष 2022 मध्ये त्याने सनरायजर्स हैदराबादसाठी चौथा सीजन खेळून 426 धावा केल्या.
हे ही वाचा >> महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने थेट पंचाला का मारली लाथ? कुस्तीनंतर तुफान राडा
अभिषेक शर्मा टी-20 रेकॉर्ड
- टोटल - 535 धावा आतापर्यंत
- मॅच - 17, (50/100-2/2)
- स्ट्राईक रेट - 193.84
अभिषेक शर्मा नेटवर्थ
- आयपीएल सॅलरी - 14 कोटी रुपये (वर्ष 2025 मध्ये अभिषेकला SRH ने रिटेन केलं. आता आयपीएलच्या एक सीजनसाठी 14 कोटी रुपये मिळतील)
- T20 मॅच फी - प्रत्येक टी-20 सामन्यासाठी 3 लाख रूपये फी
- टोटल आयपीएल इनकम - 35.7 कोटी रुपये
- अभिषेक शर्मा त्याच्या कुटुंबासोबत अमृतसर, पंजाबच्या उच्चभ्रू परिसरात राहतो. तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत असतो.
- अभिषेक शर्माला कारचीही खूप आवड आहे. अभिषेककडे BMW 3 सह अनेक कार सामील आहेत.
ADVERTISEMENT
