आशिया कपच्या फायनल सामन्यात मोहम्मद सिराजने करीअरमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. श्रीलंकेविरूद्ध मोहम्मद सिराजने सात ओव्हरमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत. या त्याच्या गोलंदाजीमुळे श्रीलंकेला पु्र्ती बॅकफुटला गेला आणि 50 धावावर ऑल आऊट झाली. आणि टीम इंडियाने अवघ्या 6 ओव्हर आणि 1 बॉलमध्ये ही धावसंख्या गाठत आठव्यांदा आशिया कपवर नाव कोरले.
ADVERTISEMENT
मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरूद्ध 7 ओव्हरमध्ये 6 विकेट घेतले आहेत. यामधील 4 विकेट तर त्याने एकाच ओव्हरमध्ये घेतले आहेत. त्यामुळे ही त्याच्या करिअरमधली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर मोहम्मद सिराजने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हे रेकॉर्ड काय आहेत, ते जाणून घेऊयात.
मोहम्मद सिराजचे रेकॉर्डस
2022 पासून वनडे क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम सिराजच्या नावावर आहे. त्याने 7 धावांत 5 विकेट घेतले. यापूर्वी हा विक्रम मखाया नितीनच्या नावावर होता. त्याने 8 धावांत 5 बळी घेतले होते.
सिराज, चमिंडा वाससह वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 5 विकेट घेणारा संयुक्त गोलंदाज ठरला. या दोघांनी कोणत्याही एकदिवसीय सामन्यात 16 चेंडूत 5 विकेट घेतल्या.
सिराजने एकदिवसीय सामन्यात पहिल्या 3 ओव्हरमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम मोडला. त्याने 5 धावांत 5 विकेट घेतले. यापूर्वी हा विक्रम अली खानच्या नावावर होता, ज्याने यावर्षी 7 धावांत 5 विकेट घेतले होते.
वनडे फॉर्मेटमध्ये आशिया कपमध्ये 6 विकेट घेणारा सिराज अजंता मेंडिसनंतर दुसरा गोलंदाज ठरला आहे.
सिराज वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या 10 ओव्हरमध्ये सर्वाधिक 5 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. जवागल श्रीनाथ, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि सिराज यांनी याआधी 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.
सिराजने 1002 बॉलमध्ये 50 एकदिवसीय विकेट पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 50 विकेट घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी अजंता मेंडिसने 847 चेंडूत 50 एकदिवसीय विकेट पूर्ण केल्या होत्या.
एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेणारा मोहम्मद सिराज पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. 2022 पासून भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम सिराजच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता. त्याने केवळ श्रीलंकेविरुद्ध 7 धावांत 4 विकेट घेतल्या.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात किमान 6 विकेट घेणारा सिराज दुसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी आशिष नेहराने 2006 मध्ये ही कामगिरी केली होती. कोलंबोमध्ये झालेल्या फायनलमध्ये दोघांनी ही आश्चर्यकारक कामगिरी केली.
सिराजने एकूण 21 धावांत 6 विकेट घेतले. मोहम्मद सिराज श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरला. त्याने वकार युनूसला मागे सोडले. वकारने 1990 मध्ये 26 धावांत 6 बळी घेतले होते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारा सिराज हा चौथा गोलंदाज ठरला आहे. सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे, ज्याने 2014 मध्ये बांगलादेशविरुद्ध 4 धावांत 6 बळी घेतले होते. अनिल कुंबळेने 1993 मध्ये 12 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या, बुमराहने 2022 मध्ये 19 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या.
ADVERTISEMENT