साहाची द्रविडवर नाराजी तरीही प्रामाणिक उत्तर देत ‘द वॉल’ ने जिंकलं फॅन्सचं मन

मुंबई तक

• 03:12 AM • 21 Feb 2022

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून पत्ता कट झालेल्या वृद्धीमान साहाने संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल उघड शब्दांत नाराजी बोलून दाखवली. यापुढे तुझा विचार होणार नाही त्यामुळे निवृत्तीचा विचार कर असा सल्ला द्रविडने दिल्याचं साहाने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. साहाच्या या नाराजीनाट्यानंतर क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं. परंतू द्रविडने या संपूर्ण […]

Mumbaitak
follow google news

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून पत्ता कट झालेल्या वृद्धीमान साहाने संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल उघड शब्दांत नाराजी बोलून दाखवली. यापुढे तुझा विचार होणार नाही त्यामुळे निवृत्तीचा विचार कर असा सल्ला द्रविडने दिल्याचं साहाने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. साहाच्या या नाराजीनाट्यानंतर क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं. परंतू द्रविडने या संपूर्ण प्रकरणावर शांत आणि प्रामाणिक प्रतिक्रीया देत सर्वांचं मन जिंकलं आहे.

हे वाचलं का?

मला या प्रकरणाचं अजिबात वाईट वाटलं नाही. भारतीय क्रिकेटसाठी साहाने जे योगदान दिलंय त्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. मी याच भावनेतून त्याच्याशी चर्चा केली. त्याला प्रामाणिकपणे ही गोष्ट सांगण्याची गरज होती. या सर्व गोष्टी त्याला मीडियातून समजाव्यात असं मला वाटलं नाही. मी या गोष्टींची चर्चा माझ्या खेळाडूंसोबत करतो. माझ्या प्रत्येक मताशी त्यांनी सहमत व्हावं हा माझा आग्रह कधीच नसतो, राहुल द्रविड वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होता.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, कसोटी संघातून अजिंक्य-पुजाराचा पत्ता कट

प्लेईंग ११ ची निवड करतानाही ज्या खेळाडूंची निवड होणार नाहीये त्यांना मी कल्पना देतो. खेळाडूंना वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे परंतू संघात सर्व गोष्टी स्पष्ट असाव्यात असं माझं मत आहे. या वर्षात भारतीय संघ अगदी मोजक्याच टेस्ट मॅच खेळणार आहे. ऋषभ पंतने स्वतःला सिद्ध केलं आहे. आम्ही आता एका तरुण विकेट किपरला ग्रुमिंग करण्याच्या विचारात आहोत. परंतू यामुळे साहाचं योगदान हे कधीच कमी होत नाही. मी स्वतःहून त्याच्याशी याबद्दल चर्चा केल्याचं राहुल द्रविडने सांगितलं.

टीम इंडियावर आता मुंबईच्या ‘हिटमॅन’ची सत्ता, कसोटी संघाचं कर्णधारपद रोहितकडे

वृद्धीमान साहाने पत्रकारांशी बोलत असताना सौरव गांगुलीबद्दलही नाराजीवजा आश्चर्य व्यक्त केलं होतं. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात मी गेल्या वर्षी नाबाद ६१ धावांची खेळी केली. तेव्हा शरीर साथ देत नव्हतं तरीही मी पेनकिलर घेऊन मैदानात उतरलो. सौरव गांगुलीने त्यावेळी मला What’s app वर मेसेज करुन अभिनंदन केलं. त्यावेळी सौरव गांगुलीने मला, तू संघातल्या तुझ्या स्थानाबद्दलची चिंता करु नकोस असंही सांगितलं. जेव्हा बोर्डाचा अध्यक्ष तुम्हाला असा मेसेज करतो तेव्हा नक्कीच तुमचा हुरुप वाढतो. पण यामध्ये इतक्या लवकर बदल कसा झाला हे मला खरंच समजलं नाही, साहाने आपली खंत बोलून दाखवली.

    follow whatsapp