Icc Cricket World Cup 2023 Live Streaming: येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. या वर्ल्ड कपची संपूर्ण क्रिकेट विश्वाला उत्सुकता लागली आहे. या वर्ल्ड कपमधला पहिला सामना 5 ऑक्टोबरला इंग्लंड विरूद्ध न्युझीलंडमध्ये रंगणार आहे. तर शेवटचा सामना हा 19 नोव्हेंबरला असणार आहे. या दरम्यान स्पर्धेत 48 सामने खेळवले जाणार आहेत. हे 48 सामने तुम्हाला मोफत पाहता येणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमींसाठी ही पर्वणीच असणार आहे. दरम्यान हे सामने कुठे मोफत पाहता येणार आहेत, हे जाणून घेऊयात. (odi world cup 2023 live streaming when where to watch match free hotstar dd sports)
ADVERTISEMENT
कुठे पाहता येणार?
वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड विरूद्ध न्युझीलंडमध्ये 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. वर्ल्ड कपमध्ये नॉकआऊट सहित 48 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामधील 45 सामनेच होतील. हे सर्व सामने देशातील 10 मैदानांवर खेळवले जाणार आहेत. तर वर्ल्ड कपचा फायनल सामना 19 नोव्हेंबरला रविवारी होणार आहे. वर्ल्ड कपचे हे सर्व सामने स्टार स्पोर्टस नेटवर्कवर दाखवण्यात येणार आहे. तर सामन्याचे फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
दरम्यान या वर्ल्ड कपसाठी आधी अक्षर पटेलला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी आता रविचंद्रन अश्विनला संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे अश्विनच्या रूपात एक अनुभवी स्पिनर टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. अश्विनच्या या अनुभवाचा टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे.
हे ही वाचा : मंत्रिमंडळ बैठक: अजित पवारांच्या गैरहजेरीत शिंदे-फडणवीसांनी घेतले दोन मोठे निर्णय!
टीम इंडियाच्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक:
8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बंगळुरू
हे ही वाचा : Caste Census : ‘हिंदूंनी त्यांचे हक्क घ्यावेत का?’, जात जनगणनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
टीम इंडियाचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.
ADVERTISEMENT