ऑलिम्पियन नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, परम विशिष्ठ सेवा पदकाने होणार सन्मान

मुंबई तक

• 12:57 PM • 25 Jan 2022

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरच चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नीरज चोप्राचा परम विशिष्ठ सेवा पदकाने सन्मान केला जाणार आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये केलेल्या ऐतिहासीक कामगिरीसाठी नीरजला हा सन्मान मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ३८४ सैन्यदलातील अधिकाऱ्यांचा विशेष पदकाने मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात सन्मान करतील. […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरच चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नीरज चोप्राचा परम विशिष्ठ सेवा पदकाने सन्मान केला जाणार आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये केलेल्या ऐतिहासीक कामगिरीसाठी नीरजला हा सन्मान मिळणार आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ३८४ सैन्यदलातील अधिकाऱ्यांचा विशेष पदकाने मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात सन्मान करतील. यात १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ठ सेवा पदक, ४ उत्तम युद्ध सेवा पदक, ५३ अति-विशिष्ठ सेवा पदक, १३ युद्ध सेवा पदक आणि ३ विशिष्ठ सेवा पदकं दिली जाणार आहेत.

टोकियो ऑलम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून भारताची मान जगभरात उंचवणाऱ्या युथ आयकॉन नीरज चोप्रासाठी हा मोठा सन्मान असेल. ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा देशातील प्रत्येकाचा हिरो झाला आहे.

    follow whatsapp