ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये चांगला खेळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदाबादमधील कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते.
आता विराटचं कौतुक चक्क पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलं आहे. माजी कर्णधार मिस्बाह उल हकने विराटची प्रशंसा केली आहे.
मिस्बाह म्हणाला, ‘मोठ-मोठ्या गोलंदाजांच्या समोर कोणत्याही कठीण परिस्थितीत केवळ कोहलीच चांगल्या धावा बनवू शकतो.’
‘कोहलीचा स्वभाव चांगला आहे आणि त्याला विजयाची भूक आहे.’ असं मिस्बाह पुढे म्हणाला.
यावेळी मिस्बाहने गेल्या T20 विश्वचषकाचं उदाहरण दिलं. जेव्हा कोहलीने पाकिस्तान विरूद्ध नाबाद 82 धावा केल्या होत्या.
सध्या कोहली ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या वनडे सामन्यात व्यस्थ आहे. तर, मिस्बाह हा लीजेंड्स लीग क्रिकेट सामन्यासाठी दोहामध्ये आहे.
ADVERTISEMENT