Paris Olympic 2024 : 46 सेकंदात प्रतिस्पर्ध्यांला गारं केलं, नंतर महिला बॉक्सरवर पुरूष असल्याचा आरोप; नेमका वाद काय?

प्रशांत गोमाणे

03 Aug 2024 (अपडेटेड: 04 Aug 2024, 02:06 PM)

Imene Khelif vs Angela Carini controversy : 46 सेकंदाच्या या लढतीत इमानने अँजेलाला दोन पंच हाणून सामना जिंकला होता. या सामन्यानंतर अँजेला कारिनीने इमान खलिफेवर पुरूष असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर सोशल मीडियावर मोठा वाद पेटला होता.

 paris olympic 2024 imene khelif vs angela carini controversy ioc and pbu gives big statement

अँजेला कारिनीने इमान खलिफेवर पुरूष असल्याचा आरोप केला होता.

follow google news

बातम्या हायलाइट

point

अँजेला कारिनीने इमान खलिफेवर पुरूष असल्याचा आरोप केला

point

या आरोपानंतर सोशल मीडियावर मोठा वाद पेटला

point

या प्रकरणात आयओसीने स्पष्टीकरण दिले

Imene Khelif vs Angela Carini controversy : संपूर्ण जगाचे लक्ष सध्या पॅरीस ऑलिम्पिकडे लागले आहे. या ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग एक सामना खूपच वादात सापडला आहे.इटलीची अँजेला कारिनी आणि अल्जेरियाची इमान खलिफे यांच्यात लढत झाली. 46 सेकंदाच्या या लढतीत इमानने अँजेलाला दोन पंच हाणून सामना जिंकला होता. या सामन्यानंतर अँजेला कारिनीने इमान खलिफेवर पुरूष असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर सोशल मीडियावर मोठा वाद पेटला होता. त्यानंतर आता या प्रकरणात आयओसीने स्पष्टीकरण दिले आहे. (paris olympic 2024 imene khelif vs angela carini controversy ioc and pbu gives big statement) 

हे वाचलं का?

नेमकं घडलं काय ?

इटलीची अँजेला कारिनी आणि अल्जेरिया इमान खलिफा यांच्यात लढत सुरु झाली. इमानने करिनीच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा मारला. कारिनीला तो इतका जोरात लागला की ती एक क्षण हललीच.तिने काही क्षण थांबून खलिफेकडे पाठ फिरवली आणि कोपऱ्यात गेली. तिथून तिने प्रशिक्षकांकडे बघून डोळ्यांनीच सांगितले की ती स्पर्धा पुढे खेळणार नाही. त्यानंतर पंचाने सामना थांबवला. 

पराभवाची घोषणा झाल्यानंतर खलिफेशी हात मिळविण्याससुद्धा कारिनीने नकार दिला, त्यानंतर ती रिंगमध्ये गुडघ्यावर बसली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.  

हे ही वाचा : Telecom Service Rule : कॉल, इंटरनेट सेवा झाली बंद, तर मिळणार नुकसान भरपाई, वाचा नवीन नियम

पत्रकारांशी बोलतानाही कारिनी रडत होती. ती म्हणाली, मी माझ्या वडिलांचा मान राखण्यासाठी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरले होते पण मला हा ठोसा बसल्यावर प्रचंड वेदना झाल्या, माझा जीव जाण्याऐवजी मी मॅच सोडणं पसंत केलं. 

पुढे ती म्हणाली, मी हे ठरवणारी कुणी नाही पण ज्या खेळाडूंमध्ये पुरुषांचे गुणधर्म आहेत, त्यांना महिला खेळाडूंच्या सामन्यांत सहभागी होण्यास परवानगी मिळू नये. तिचा रोख सरळसरळ इमान खलिफावर होता.

आयओसीचे वादावर स्पष्टीकरण 

आयओसीने म्हटले आहे की, याआधी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या मनमानी निर्णयामुळे वादग्रस्त ॲथलीट इमेन खलिफ  या वादात अडकली आहे. याप्रकरणी ऑलिम्पिक समितीने स्पष्टीकरण दिले आहे. आयओसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इमेन खलिफ आयबीएच्या अचानक आणि मनमानी निर्णयाचा बळी ठरली आहे. गेल्या वर्षी जेव्हा जागतिक स्पर्धा संपणार होती, तेव्हा तिला अचानक अपात्र ठरवण्यात आले होते. हा निर्णय आयबीएच्या सीईओने घेतला होता .

हे ही वाचा : Ladki bahin Yojana : 19 ऑगस्टला मिळणार पैसे, तुमचा अर्ज कुठंपर्यंत पोहोचला; कसे बघणार?

पीबीयू आणि आयओसीने गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता खेळाचा सराव करण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले. बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंनी पॅरिस २०२४ बॉक्सिंग युनिटने ठरवलेल्या वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन केले आहे. सर्व खेळाडूंचे लिंग आणि वय त्यांच्या पासपोर्टवर आधारित आहे. तर आता इमेन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिची मोहीम सुरू ठेवणार आहे.

    follow whatsapp