आगामी रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट संघटनेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. ४१ वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाचं यंदाचं नेतृत्व पृथ्वी शॉकडे सोपवण्यात आलेलं आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी मुंबईचा समावेश क गटात करण्यात आला असून १३ जानेवारीपासून मुंबईचा पहिला सामना महाराष्ट्राशी होणार आहे.
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरलाही या संघात स्थान देण्यात आलं आहे. याआधी अर्जुन तेंडुलकरने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
पृथ्वी हा एक चांगला कर्णधार आहे, सलामीलाही तो चांगली कामगिरी करतो. याव्यतिरीक्त तुम्हाला आणखी काय हवंय अशी प्रतिक्रीया मुंबईच्या निवड समितीचे प्रमुख सलिल अंकोला यांनी पीटीआयशी बोलताना दिली. याव्यतिरीक्त युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, अरमान जाफर यांनाही या संघात संधी मिळाली आहे.
असा आहे मुंबईचा रणजी करंडक स्पर्धेसाठीचा संघ –
पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, प्रशांत सोलंकी, शशांक अत्राडे, धवल कुलकर्णी, मोहीत अवस्थी, प्रिन्स बदीयानी, सिद्धार्थ राऊत, रोस्टन डायन आणि अर्जुन तेंडूलकर
ADVERTISEMENT