श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत?

मुंबई तक

• 11:10 AM • 11 May 2021

१८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध World Test Championship ची फायनल मॅच खेळल्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी स्टार खेळाडूंना संधी न देता बीसीसीआय नवोदीत खेळाडूंवर जबाबदारी टाकणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने श्रीलंका दौऱ्याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय NCA चा संचालक राहुल द्रविड आणि त्याच्या सहकाऱ्यांना […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

१८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध World Test Championship ची फायनल मॅच खेळल्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी स्टार खेळाडूंना संधी न देता बीसीसीआय नवोदीत खेळाडूंवर जबाबदारी टाकणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने श्रीलंका दौऱ्याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय NCA चा संचालक राहुल द्रविड आणि त्याच्या सहकाऱ्यांना प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी सांगू शकतं.

हे वाचलं का?

Cricbuzz ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. सध्या NCA (National Cricket Academy) चा संचालक म्हणून काम पाहणाऱ्या राहुल द्रविडकडे देशातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तयार करणं आणि इंज्युअर्ड खेळाडूंच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचं काम आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहकारीही इंग्लंडमध्येच असतील. अशावेळी श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविडवर प्रशिक्षकपदाची जबाबदारी येऊ शकते.

अद्याप या प्रकरणात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड टीम इंडियाच्या दुसऱ्या बॅचसोबत श्रीलंकेत जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारताचा वन-डे संघ ५ जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर २८ जुलैला तो श्रीलंकेतून भारताला रवाना होईल. श्रीलंकेतील कोणत्या मैदानावर सामने खेळवले जातील याबद्दल माहिती समजू शकलेली नाही, तरीही हंबनटोटा आणि दम्बुला येखील मैदानावर हे सामने खेळवले जाऊ शकतात. २०१८ साली झालेल्या निदहास ट्रॉफीनंतर भारतीय संघ श्रीलंकेत एकही सामना खेळलेला नाहीये.

    follow whatsapp