टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि सध्या NCA (National Cricket Academy) चा प्रमुख असलेल्या राहुल द्रविडकडे नवी जबाबदारी येणार आहे. जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध सिरीजसाठी राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. ANI वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
शिखर धवन की हार्दीक पांड्या? श्रीलंका दौऱ्यासाठी कॅप्टन निवडीवरुन BCCI समोर पेच
जुन महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध WTC चा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध टेस्ट मॅचची सिरीज खेळले. टीम इंडियाचे सर्व महत्वाचे प्लेअर्स इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी नवोदीत प्लेअर्सना संधी द्यायचं ठरवलंय. प्रशिक्षक रवी शास्त्री, विक्रम राठोड, भारत अरुण हे टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये असणार आहेत, त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाला राहुल द्रविडचं मार्गदर्शन मिळणार आहे.
टेस्ट खेळत नसलेल्या टीम इंडियाच्या प्लेअर्सना श्रीलंका दौऱ्यात संधी मिळणार आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन व आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंची श्रीलंका दौऱ्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे. “टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ हा इंग्लंडमध्ये असेल आणि श्रीलंका दौऱ्यासाठी जे प्लेअर्स आहेत त्यातील बहुतांश खेळाडू भारत अ संघाकडून राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळले आहेत. त्यामुळे या सर्व खेळाडूंसोबत वावरण्याचा आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव राहुल द्रविडकडे आहे”, ज्याचा फायदा श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला होईल अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ANI ला दिली.
BLOG : चक्रव्युहात अडकलेला टीम इंडियाचा अभिमन्यू
NCA ची जबाबदारी घेण्याआधी राहुल द्रविड भारत अ आणि १९ वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक होता. महिन्याअखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडिया क्वारंटाइन कालावधी पूर्ण करेल. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे खेळणार आहे. १३ ते २७ जुलै दरम्यान भारतीय संघाचा श्रीलंदा दौरा रंगणार आहे.
Team India च्या खेळाडूंना लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये मिळणार
ADVERTISEMENT