Virat Kohli : कोहली आउट होता की नॉटआउट? ICC चा नियम काय सांगतो?

रोहिणी ठोंबरे

22 Apr 2024 (अपडेटेड: 22 Apr 2024, 03:33 PM)

Virat Kohli No-ball Controversy : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) च्या चालू सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ची खराब खेळी आजही कायम आहे. रविवारी (21 एप्रिल) ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात RCB चा कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) एका धावेने पराभव केला.

Mumbaitak
follow google news

Virat Kohli No-ball Controversy : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) च्या चालू सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ची खराब खेळी आजही कायम आहे. रविवारी (21 एप्रिल) ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात RCB चा कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) एका धावेने पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सहावा पराभव असून त्यांचा संघ पॉइंटर्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. 

हे वाचलं का?

RCB vs KKR सामन्यात कोहली आउट झाल्यावर का उडालीये खळबळ?

रविवारी 21 एप्रिल रोजी रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघातील सामन्यात विराट कोहलीला वादग्रस्त पद्धतीने आउट देण्यात आले. तिसऱ्या षटकात, हर्षित राणाने पहिला बॉल हाय फुलटॉस टाकला, ज्यावर कोहलीने बॅटिंग केली. शॉट मारण्याची ही वेळ योग्य नव्हती आणि यानंतर बॉल हर्षितने झेलला. 

कोहलीला विश्वास होता की बॉल कमरेच्या वर आला आहे, म्हणून त्याने DRS घेतला. हॉक-आयच्या मदतीने तिसऱ्या अंपायरला असे आढळून आले की कोहली क्रीजच्या पुढे असूनही बॉल डीप होत होता, अशात त्याने आउट असल्याचा निर्णय दिला. यावेळी पॅव्हेलियनमध्ये परतताना कोहली अंपायरशी भिडला.

या निर्णयाबाबत जर ICC च्या नियमानुसार पाहायचं झालं तर, तिसऱ्या अंपायरने दिलेला निर्णय नियमानुसार योग्य होता. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियम 41.7.1 नुसार, 'जमिनीवर टप्पा न घेता बॉल थेट क्रीझमध्ये उभ्या असलेल्या फलंदाजाच्या कंबरेच्या उंचीवरून जातो तेव्हा तो बॉल अवैध ठरतो. अशावेळी अंपायर त्याला नो-बॉल घोषित करतात. पण कोहलीच्या आउट होण्याच्या बाबतीत, तो त्याच्या क्रीजच्या बाहेर उभा होता आणि जोपर्यंत तो पॉपिंग क्रीझवर पोहोचला तोपर्यंत बॉल त्याच्या कमरेच्या उंचीवरून डीप झाला. 

यावेळी तिसऱ्या अंपायरने निर्णय घेण्यासाठी हॉक-आय तंत्राचा वापर केला. जेव्हा कोहली बॉलच्या इम्पॅक्टमध्ये आला तेव्हा तो क्रीजच्या बाहेर उभा होता. जर कोहली पॉपिंग क्रीजमध्ये नॉर्मल उभा राहिला असता तर त्याच्या कंबरेची उंची 1.04 मीटर असती. मात्र, तो जेव्हा त्याच्या क्रीजबाहेर खेळला तेव्हा चेंडू त्याच्या कमरेच्या वर होता. जर तोच चेंडू पॉपिंग क्रीजवर पोहोचला असता तर त्याची उंची 0.92 मीटरपर्यंत घसरली असती. याचा अर्थ, कोहली जर क्रीजच्या आत असता तर चेंडू त्याच्या कमरेच्या उंचीच्या खाली असता.

माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूचा विराट कोहलीला पाठिंबा

दुसरीकडे, टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि वसीम जाफर यांनी नियमांमध्ये बदल करण्याची विनंती केली. सिद्धू म्हणाले, 'न्याय म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी. मी विराट आणि आरसीबी दोघांसाठी दु:खी आहे. जेव्हा तुम्ही उंचीबाबत नियम आणला. मग तेव्हा तुम्ही हे पाहिलत का की, पायापासून ते सहा इंच उंच आहे ? किंवा त्याची उंची मोजताना तुम्ही त्याला सात इंचांची मोकळीक दिली. ही पहिली गोष्ट आहे.

सिद्धू पुढे म्हणाले, 'सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही बीमरला कायदेशीर मान्यता दिली आहे. माझ्या काळात जेव्हा बॉल गोलंदाजाच्या हातातून कमरेच्या वर सुटायचा तेव्हा गोलंदाज आपले दोन्ही हात वर करून माफी मागायचा. पण उद्या जर कोणी स्टेप आउट करून तुमच्या डोक्यावर चेंडू मारला तर तुम्ही माफी मागणार नाही. तुम्ही बीमर कायदेशीर करत आहात?

'तिसरी गोष्ट...जेव्हा चेंडू त्याच्या बॅटला लागतो तेव्हा तो त्याच्या कमरेच्या वर 1-1.5 फूट होता आणि तो क्रीजच्या बाहेर सहा इंच होता. एक फूट जाता जाता बॉल दोन फूट डीप करून गेला. जेव्हा शंका येते तेव्हा त्याचा फायदा फलंदाजाला मिळायला हवा. नियम केवळ बदलासाठी बनवले जात नाहीत तर ते सुधारण्यासाठी बनवले जातात. या नियमाचा फेरविचार करून बदल करावा.' असे नवजोत सिंग सिद्धू म्हणाले.


 

    follow whatsapp