ADVERTISEMENT
महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यूपी वॉरियर्सचा 5 विकेटने पराभव करत पहिला विजय मिळवला.
सामनावीर (Player Of The Match) कनिका अहुजाने आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
कनिका अहुजाने 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली.
कनिका अहुजाचा जन्म पटियाला येथे झाला. ती पंजाबच्या महिला संघाकडून क्रिकेट खेळते.
कनिकाने कमलप्रीत संधूकडून पटियाला येथील झील गावात असलेल्या क्रिकेट हब अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे.
20 वर्षीय कनिका आपल्या आक्रमक अंदाजात खेळण्यासाठी ओळखली जाते.
कनिका आहुजाने गेल्यावर्षी सीनियर महिला वनडे ट्रॉफीमध्ये भारत-ए संघासाठी उत्कृष्ट खेळी खेळली होती.
आरसीबीने महिला प्रीमियर लीगच्या लिलावात कनिकासाठी 35 लाखांची बोली लावली होती.
ADVERTISEMENT