विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघात बेबनाव असल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत. त्यापैकी इंग्लंड दौऱ्यावर असताना टीम इंडियातल्या काही खेळाडूंनी विराटबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केल्याचं समजतंय. ज्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या रविचंद्रन आश्विनचाही समावेश होता अशा बातम्या समोर आल्या.
ADVERTISEMENT
या बातम्यांवर अखेरीस आश्विनने आपलं मौन सोडलं आहे. IANS वृत्तसंस्थेने आश्विनने विराटची तक्रार केल्याची बातमी दिली होती.
आश्विनने आपल्या इन्स्टाग्राम हँडलच्या स्टोरीवर या बातम्यांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. ज्यात तो असं म्हणतो, “‘फेक न्यूज देणाऱ्या हॅण्डलचा मी शोध घेत आहे. गॉसिप करण्यासाठी हे मजेदार आहे”. यानंतर अश्विनच्या चाहत्यांनी त्याला ही बातमी कुठून आली त्याबद्दल सांगितलं, यावर अश्विनने प्रतिक्रिया दिली की, “धन्यवाद मित्रांनो, त्यांनी आता स्वत:चं नाव बदलून आयएएनएस ठेवलं आहे. बाकीची माध्यमं त्यांच्या हवाल्याने वृत्त देत आहेत. खूपच मजा आहे ही”.
इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीने अश्विनला एकही टेस्ट मॅचमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. यानंतर विराट कोहलीवर चौफेर टीका करण्यात आली. टीममध्ये संधी मिळत नसल्यामुळे अश्विनला असुरक्षित वाटत होतं आणि त्याने बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे विराटची तक्रार केल्याचं या वृत्तात म्हणलं गेलं होतं.
अश्विनसोबतच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनीही विराट कोहलीची तक्रार केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या, पण बीसीसीआयने या बातम्याही फेटाळून लावल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यावेळी वाद झाल्यामुळे विराटने अचानक टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याचंही सांगितलं गेलं. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार आहे.
IPL 2021 : मॉर्गनविरुद्ध झालेल्या वादावर आश्विनचं स्पष्टीकरण, म्हणाला…
ADVERTISEMENT