टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज KKR सोडणार? कोणत्या संघात खेळणार? IPL लिलावाआधी दिले संकेत

मुंबई तक

19 Aug 2024 (अपडेटेड: 19 Aug 2024, 06:15 PM)

Rinku Singh Big Statement On IPL 2025 Mega Auction : आयपीएलमध्ये षटकारांचा पाऊस पाडणारा भारताचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंग सध्या चर्चेत आला आहे. बेस्ट फिनिशर म्हणून रिंकूनं क्रिकेटच्या मैदानात छाप टाकली आहे. परंतु, रिंकू आता त्याच्या प्रतिक्रियेमुळं प्रकाशझोतात आला आहे.

Rinku Singh Latest News

Rinku Singh

follow google news

बातम्या हायलाइट

point

IPL मध्ये टीम इंडियाच्या डावखुऱ्या फलंदाजाने केली चमकदार कामगिरी

point

षटकारांचा पाऊस पाडणारा फलंदाज KKR सोडणार?

point

आयपीएल २०२४ च्या लिलावाआधी समोर आली क्रिकेटची मोठी अपडेट

Rinku Singh Big Statement On IPL 2025 Mega Auction : आयपीएलमध्ये षटकारांचा पाऊस पाडणारा भारताचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंग सध्या चर्चेत आला आहे. बेस्ट फिनिशर म्हणून रिंकूनं क्रिकेटच्या मैदानात छाप टाकली आहे. परंतु, रिंकू आता त्याच्या प्रतिक्रियेमुळं प्रकाशझोतात आला आहे. आगामी आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने रिंकूला रिलीज केलं, तर तो कोणत्या संघाकडून खेळेल? असा प्रश्न तमाम क्रिकेट प्रेमींना पडला आहे. परंतु, खुद्द रिंकू सिंगने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोलकाताने रिलीज केल्यास आरसीबीकडून खेळायला आवडेल, असं रिंकू म्हणाला आहे. 

हे वाचलं का?

रिंकू सिंग मुलाखतीत काय म्हणाला?

स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत रिंकू म्हणाला, "आयपीएल २०२५ च्या लिलावाआधी केकेआरने मला रिलीज केलं, तर मी आरसीबीकडून खेळणं पसंत करेल. त्या संघात विराट कोहली आहे, हे यामागचं कारण आहे." रिंकूने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळं केकेआरच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा >> "मी जर राजकारण आलो, तर..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांना मनोज जरांगेंचा इशारा, नेमकं काय म्हणाले?

या डावखुऱ्या फलंदाजाने १८ ऑगस्ट २०२३ ला डबलिनमध्ये आयर्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतासाठी पहिला सामना खेळला होता. त्याने १९ डिसेंबर २०२३ ला दक्षिण आफ्रिके विरुद्ध वनडेत पदार्पण केलं होतं. रिंकूने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन एक वर्ष पूर्ण झाल्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रिंकुने पोस्टमध्ये लिहिलंय, "स्वप्नांना हाकीकत मध्ये बदलण्यात एक वर्ष पूर्ण झाला आहे. ब्लू जर्सीत खेळलेल्या प्रत्येक क्षणासाठी आभार व्यक्त करतो. जय हिंद."

हे ही वाचा >> Sanjay Raut: 'नमक हराम' हा चित्रपट मी काढणार आहे, संजय राऊतांनी कुणावर साधला निशाणा?

रिंकूला टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये टीम इंडियात राखीव खेळाडू म्हणून सामील केला होता. त्यानंतर रिंकू सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेसाठी मैदानात उतरला. आता रिंकू यूपीच्या टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. या टूर्नामेंटमध्ये तो मेरठ मावेरिक्स या संघाची कॅप्टन्सी करणार आहे. २५ ऑगस्टपासून ही टूर्नामेंट सुरु होणार आहे. 

रिंकूने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४५ सामने खेळले असून ८९३ धावा कुटल्या आहेत. यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे. २०२४ च्या आयपीएलमध्ये रिंकूने १६८ धावा केल्या.  २०२३ मध्ये रिंकूने तुफानी खेळी केली होती. या हंगामात रिंकूने ४७४ धावा केल्या होत्या. केकेआरने २०२४ चा आयपीएलचा किताब जिंकला होता. 

    follow whatsapp