ऋषभ पंतला उपचारासाठी मुंबईत आणणार? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

मुंबई तक

• 10:58 AM • 04 Jan 2023

Rishabh Pant Health Update: गेल्या आठवड्यात क्रिकटपटू ऋषभ पंत कार (Indian Cricketer) अपघातात जखमी झाला. डेहराडूनमधील रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू असताना त्याच्या तब्येतीबद्दल माहिती समोर आली आहे. बीसीसीआय (BCCI) अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभला आता डेहराडूनहून मुंबईला उपचारासाठी हलवण्यात येणार आहे. पंतला उपचारासाठी परदेशातही पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र त्या पर्यायावर अद्याप […]

Mumbaitak
follow google news

Rishabh Pant Health Update: गेल्या आठवड्यात क्रिकटपटू ऋषभ पंत कार (Indian Cricketer) अपघातात जखमी झाला. डेहराडूनमधील रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू असताना त्याच्या तब्येतीबद्दल माहिती समोर आली आहे. बीसीसीआय (BCCI) अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभला आता डेहराडूनहून मुंबईला उपचारासाठी हलवण्यात येणार आहे. पंतला उपचारासाठी परदेशातही पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र त्या पर्यायावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.

हे वाचलं का?

ऋषभ पंतच्या उपचाराविषयीची माहिती देताना बीसीसीआयने काय सांगितले?

“पंतला या वेदनादायक टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व शक्य वैद्यकीय मदत आणि सर्वतोपरी मदत मिळेल याची काळजी घेतली जाईल. चांगले उपचार आणि लिगामेंटच्या समस्येमुळे ऋषभ पंतला डेहराडूनहून मुंबईला हलवण्यात येत आहे. ऋषभ बीसीसीआयचे ऑर्थोपेडिक डॉक्टर दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली असतील. जर, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्यास ऋषभला इंग्लंड किंवा अमेरिकेत हलवण्यात येईल.” अशी माहिती देण्यात आली.

Rishabh Pant : जखमी ऋषभ कधीपर्यंत मैदानावर परतणार? डॉक्टरांची माहिती

ऋषभ पंतची दुखापत आणि तब्येतीबाबत सध्या कोणतीही माहिती सांगण्यात आली नाही. तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. त्याची यावर्षीच्या खेळात पुन्हा वापसी होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच, ऋषभ पंतला दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वन-डे सीरीजसाठी टीम इंडियामध्ये निवडण्यात आले नाही. याआधी बीसीसीआयने ऋषभ पंतला रिहॅबसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्येही जाण्यास सांगितले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

उत्तराखंडमधील दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर ऋषभची भरधाव वेगात असलेली मर्सिडीज कार डिव्हायडरवर आदळली. या अपघातात थोडक्यात बचावलेल्या ऋषभ पंतच्या कपाळाला दुखापत झाली आहे. उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाला, उजव्या गुडघ्याला आणि पाठीला दुखापत झाली. या घटनेनंतर काही लोकांनी ऋषभ पंतला रुडकीच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.

    follow whatsapp