Rohit Sharma Drs Controversy : मुंबई इंडियन्सने (mumbai indians) मंगळवारी रॉयल चॅंलेजर्स बंगळुरूचा (royal challengers Banglore) 6 विकेट राखून पराभव केला. मुंबईच्या विजयाने एकीकडे फॅन्स खुश असताना, दुसरीकडे रोहित शर्माला (Rohit Sharma) चुकीच्या पद्धतीने ऑऊट दिल्याने फॅन्स चांगलेच भडकले होते. अनेकांनी थर्ड अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. सामन्याचे समालोचन करणाऱ्या मोहम्मद कैफ आणि मुनाफ पटेलने देखील या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केला होता. त्यामुळे आता खरंच रोहित शर्मा त्या सामन्यात आऊट होता की नॉट आऊट होता, हे LBW च्या 3M डिआरएस क्लॉजच्या नियमानुसार जाणून घेऊयात. (rohit sharma drs controversy lbw 3m rool book of ipl 2023 mumbai indians vs royal challengers banglore)
ADVERTISEMENT
रोहित कसा आऊट झाला?
बंगळुरुकडून वानिंदु हसरंगा ओव्हर टाकत होता. यावेळी हसरंगासमोर रोहित शर्मा बॅटींग करत होता. हसरंगाच्या बॉलवर रोहित शर्माने (Rohit Sharma) पाय बाहेर टाकून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान बॉल जाऊन रोहित शर्माच्या पॅडवर लागली आणि हसरंगाने जोरदार अपील केले.या अपीलवर मैदानावरील अंपायरने नॉटआऊट दिले.यानंतर बंगळुरुच्या कर्णधार फॅफ डुप्लेसीसने डिआरएसची मागणी केली आणि निकाल थर्ड अंपायरपर्यंत गेला.
हे ही वाचा : मुंबई इंडियन्सला मोठा झटका, जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर
थर्ड अंपायरने रिव्ह्यु घेतला, यामध्ये बॅटीला बॉलचा कट लागला नव्हता. आणि बॉल ट्रॅकींग डिवाईसने पाहिल्यानंतर कळालं की, बॉल रोहितच्या पॅडवर इम्पॅक्ट केल्यानंतर थेट जाऊन स्टम्पवर आदळला होता. यावर रोहित शर्माला आऊट करार देण्यात आले होते. रोहित शर्माला आऊट दिल्याने समालोचकापासून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. अशा परिस्थितीत जर LBW च्या 3M डिआरएस क्लॉजचा नियम पाहिला तर तो नॉट आऊट असता. हे कसे शक्य आहे, ते पाहूयात.
LBW चा 3M नियम नेमका काय?
LBW च्या 3M डिआरएस क्लॉज नियमानुसार, पॉईंट ऑफ इम्पॅक्टमध्ये बॅट्समनच्या पायावर आदळणाऱ्या बॉलमध्ये इम्पॅक्ट आणि स्टम्पच्या मधील अंतर 3 मीटरपेक्षा अधिक असल्यास, संशयाची परिस्थिती निर्माण होते.अशावेळी खेळाडूला आऊट करार दिले जात नाही. याच नियमानूसार जेव्हा बॉल रोहितच्या पॅडवर लागली त्यावेळी स्टम्पसमधील अंतर 3.7 मीटरपेक्षा जास्त होते. अशाप्रकारे रोहित शर्मा (Rohit Sharma) नॉटआऊट होता, पण अंपायरच्या चुकीमुळे त्याला मैदानातील बाहेर जावे लागले.
हे ही वाचा : विराट कोहली-गौतम गंभीरला लाखोंचा दंड? पण, भरणार दुसरेच,’हा’ नियम बघा
असा रंगला सामना
दरम्यान या सामन्यात बंगळुरुने प्रथम फलंदाजी करून 6 विकेट गमावून 166 धावा ठोकल्या होत्या. बंगुळुरूकडूने ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ डुप्लेसीसने अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे मुंबईसमोर 200 धावांचे आव्हान होते.मुंबईने हे आव्हान 21 बॉल आणि 6 विकेट राखून पुर्ण केले. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) आणि नेहाल वाढेराने अर्धशतकीय खेळी केली होती.
ADVERTISEMENT