भारतीय संघाच्या टी-२० संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर मुंबईकर रोहित शर्माच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी येण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या अजिंक्य रहाणेच्या जागेवर बीसीसीआय रोहित शर्माकडे कसोटी संघाच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासूनच रोहितला कसोटी संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित केलं जाऊ शकतं.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआय कसोटी संघात हा बदल करण्याच्या तयारीत होतं. सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून बीसीसीआयने रोहितला विश्रांती दिली होती. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी रोहितच्या खांद्यावर कसोटी संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात येऊ शकतं.
“निवड समितीची बैठक लवकरच पार पडेल. अशी शक्यता आहे की रोहितला कसोटी संघाचा उप-कर्णधार बनवलं जाईल. भारतीय संघ हा दक्षिण आफ्रिकेत खेळण्यासाठी कटीबद्ध आहे. परंतू हा दौरा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार नाही. बीसीसीआयने याबद्दल क्रिकेट साऊथ आफ्रिका बोर्डाशी संपर्क साधला असून त्यांना याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.” बीसीसीआयमधील सूत्रांनी माहिती दिली.
अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवून बराच कालावधी झाला. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यने ऑस्ट्रेलियात भारतीय संघाचं नेतृत्व करुन खडतर काळात संघाला विजय मिळवून दिला आहे. परंतू बॅटींगमधली निराशाजनक कामगिरी ही अजिंक्यसाठी नेहमी चिंतेचा विषय बनली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अजिंक्यने कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ३६ च्या सरासरीने रन्स केल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्ध मालिकेतही अजिंक्य ७ डावांमध्ये १०९ धावा करु शकल्या. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यातही अजिंक्य फलंदाजीत आपली चमक दाखवू शकला नाही. मुंबई कसोटी सामन्यात अजिंक्यला दुखापतीच्या कारणामुळे संघातलं स्थान गमवावं लागलं.
बॉलिवूड अभिनेत्रींपुढे ‘या’ क्रिकेटर्संनी टाकली विकेट!
ADVERTISEMENT