आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांची मॅच रंगतदार ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. बंगळूरुचा आयपीएलच्या 14 व्या सिझनमधील हा सलग चौथा विजय होता.
ADVERTISEMENT
राजस्थानने आरसीबीला जिंकण्यासाठी 178 रन्सचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने एकही विकेट गमावता सामना जिंकला. देवदत्त पडीक्कलने धडाकेबाज फलंदाजी करत शतक मारलं. पडीक्कलने 52 चेंडूंत नाबाद १०१ रन्सची खेळी केली. तर कोहलीने नाबाद 72 रन्स केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. राजस्थानचे पहिले चार खेळाडू स्वस्तात तंबूत परतले. शिवम दुबे आणि रायन पराग यांनी चांगली भागीदारी करत पाचव्या विकेटसाठी 66 रन्स केले. शिवमने 32 चेंडूंत 46 रन्स केले. त्यानंतर राहुल तेवातियाने 23 चेंडूंत 40 रन्स केल्यामुळे राजस्थानला 177चा पल्ला गाठता आला.
बंगळुरुची या आयपीएलच्या सिझनमध्ये चांगली सुरुवात झाली आहे. बंगळुरुने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आजचा आरसीबीचा चौथा विजय ठरलाय. या विजयाने आठ गुणांसह आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलंय.
ADVERTISEMENT