Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर आजही कमाईत सुपरहिट! इतकं आहे नेटवर्थ…

रोहिणी ठोंबरे

24 Apr 2023 (अपडेटेड: 24 Apr 2023, 12:25 PM)

भारतीय क्रिकेटमध्ये सचिनने बजावलेली भूमिका विसरता येणार नाही. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी कमाईच्या बाबतीत तो सुपरहिट आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेऊया

Mumbaitak
follow google news

Sachin Tendulkar 50th Birthday : मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आज (24 एप्रिल) 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरघोस धावा करणाऱ्या या महान फलंदाजाची ही उंच भरारी दाद देण्यासारखीच आहे. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम करत आपले नाव इतिहासात नोंदवले आहे. सचिनला क्रिकेटमधून निवृत्त होऊन 10 वर्षे उलटली असली तरी लोक आजही त्याच्यावर मनापासून प्रेम करतात.भारतासह जगात जेव्हा जेव्हा क्रिकेटची चर्चा होते तेव्हा सचिन तेंडुलकरचा नेहमीच उल्लेख होतो. (Sachin Tendulkar is still a superhit in earnings Get know about his net worth)

हे वाचलं का?

भारतीय क्रिकेटमध्ये सचिनने बजावलेली भूमिका विसरता येणार नाही. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी कमाईच्या बाबतीत तो सुपरहिट आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेऊया, सचिन ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर माध्यमातून किती कमाई करतो हे सविस्तर वाचा.

NCP खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?,. हाती ‘द न्यू BJP’ पुस्तक; म्हणाले…

सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती आहे?

सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. तर 2013 मध्ये त्याने निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30,000 धावांचा टप्पा गाठणारा सचिन तेंडुलकर हा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. भारतीय संघाकडून खेळताना त्याने अनेक विक्रम केले आणि जगात वेगळी छाप सोडली.

सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 175 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1436 कोटी रुपये आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन जाहिरातींमधून बक्कळ कमाई करत आहे. याशिवाय अनेक मोठ्या कंपन्या सचिनची कारकीर्दी आणि व्यक्तीमत्वामुळे त्याला जाहिरातींमध्ये घेण्यास प्राधान्य देतात.

कधी बिकिनी गर्ल तर कधी कपलचा किस… वैतागून मेट्रो प्रशासनाचं मजेशीर ट्विट

ब्रँड एंडोर्समेंटमधूनही सचिन करतो बक्कळ कमाई

बूस्ट, अनअकॅडमी, कॅस्ट्रॉल इंडिया, बीएमडब्ल्यू, ल्युमिनस इंडिया, सनफिस्ट, एमआरएफ टायर्स, अविवा इन्शुरन्स, पेप्सी, अॅडिदास, व्हिसा, ल्युमिनस, सान्यो, बीपीएल, फिलिप्स, स्पिनी यासारख्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये सचिन अनेकदा टीव्हीवर दिसतो. याशिवाय जियो सिनेमाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, एमएस धोनी आणि स्मृती मानधना तसेच सचिन तेंडुलकर यांना आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. या सर्वातून सचिन अफाट पैसा कमावतो.

यासह सचिनचे आलिशान बंगलेही आहेत. मुंबईतील वांद्रे विभागात त्यांचा एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. 2007 मध्ये त्याने हा बंगला 40 कोटी रुपयांना विकत घेतला होता. तसेच, केवळ मुंबईतच नाही तर केरळमध्येही त्याचा कोट्यवधींचा बंगला आहे. त्याचवेळी त्याचा मुंबईतील वांद्रे येथील कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे.

‘शिंदे सरकार 15 दिवसात पडणार..’, संजय राऊतांच्या दाव्यामागची काय आहे कहाणी?

सचिन तेंडुलकरकडे जबरदस्त लक्झरी कार कलेक्शन

सचिन तेंडुलकरला कारची खूप आवड आहे. तो 20 कोटींच्या कारमध्ये फिरतो. त्याच्याकडे जबरदस्त कार कलेक्शन आहेत. यामध्ये फरारी, बीएमडब्ल्यू, ऑडी, निसान असे अनेक ब्रँडचे कार कलेक्शन आहेत.

    follow whatsapp