Sanju Samson: "T20 वर्ल्डकपची फायनल खेळणार होतो, पण रोहितने...", संजूने उडवली खळबळ

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 01:06 PM)

Sanju Samson on T20 World Cup 2024 Final : संजू सॅमसनने एक मोठा खुलासा केला आहे. संजूने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजूने विमल कुमारच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. 

Sanju Samson on T20 World Cup 2024 Final

Sanju Samson On Rohit Sharma

follow google news

बातम्या हायलाइट

point

संजू सॅमसनने टी-20 वर्ल्डकप 2024 बाबत दिली मोठी प्रतिक्रिया

point

संजू सॅमसनने रोहित शर्माबाबत केलं मोठं विधान

point

संजू सॅमसनला टी-२० वर्ल्डकपच्या फायनलच्या सामन्यातून का वगळलं?

Sanju Samson On T20 World Cup 2024 Final : संजू सॅमसनने एक मोठा खुलासा केला आहे. संजूने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'मी फायनल खेळणार होतो, पण शेवटच्या क्षणी मला प्लेईंग 11 मधून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता', असं संजूनं म्हटलं आहे. संजूने विमल कुमारच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. 

हे वाचलं का?

काय म्हणाला संजू सॅमसन?

"फायनलची सकाळ होती. मला सामना खेळण्याची संधी मिळत होती. मला तयार राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मी फायनलचा सामना खेळण्यासाठी एकदम सज्ज झालो होतो. परंतु, प्लेईंग 11 मध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही, असा निर्णय टॉसच्या आधी घेण्यात आला होता.जेव्हा ही गोष्ट समोर आली, तेव्हा थोडा निराश झालो होतो.

हे ही वाचा >> Viral Video : 'मुन्नी बदनाम गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स'; 'IIT Bombay' चा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

पण अशा गोष्टी घडत राहतात, असा मी विचार केला. त्याचदरम्यान वॉर्मअप करत असताना रोहित भाई माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्याशी चर्चा केली. त्याने हा निर्णय का घेतला आहे, याबाबत रोहितने मला सांगितलं. रोहित भाईने त्याच्या पद्धतीने मला समजावलं. हे सर्व मला समजतं, तुम्ही सामना खेळा. सामना संपल्यानंतर आपण यावर बोलू, असं प्रत्युत्तर मी रोहितला दिलं.

आमच्यात अशी चर्चा झाल्यावर रोहित तिथून निघून गेला पण एक मिनिटानंतर तो पुन्हा परत आला आणि म्हणाला, तू तुझ्या मनात माझ्याविषयी खूप काही बोलत आहेस. मला असं वाटतं. तू खूश नाही आहेस. रोहितने असं म्हटल्यावर म्हणालो की, नाही भाई..असं काही नाही. त्यानंतर रोहित भाई आणि माझ्यात काही वेळ चर्चा रंगली. मी रोहित भाईच्या कॅप्टन्सीत फायनलचा सामना खेळू शकलो नाही, याचं मला थोडसं वाईट वाटलं".

हे ही वाचा >> Chanakya Niti : प्रेमात मिळालाय धोका? चाणक्य नीतीच्या 'या' 4 गोष्टी लक्षातच ठेवा, प्रेमही वाढेल अन् नातंही टीकेल

टी-२० वर्ल्डकपच्या फायनलच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात रिषभ पंतला चमकदार कामगिरी करता आली नाही. पंत दक्षिण आफ्रिकेविरोधात स्वस्तात माघारी परतला होता. तसच या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल घेतल्यानं टीम इंडियाला फायनलच्या सामन्यात विजय मिळवता आला. 

    follow whatsapp