फिक्सिंग… अश्लील मेसेज, जाणून घ्या शेन वॉर्नचे गाजलेले वाद

मुंबई तक

• 01:45 AM • 06 Mar 2022

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. क्रिकेटमधील महान क्रिकेटपटू ठरलेला वॉर्न खासगी आयुष्यात मात्र बराच वादग्रस्त ठरला होता. आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना पळता भुई थोडी करणारा वॉर्न मात्र अश्लील मेसेज, फिक्सिंग, ड्रग्स, लाच यासारख्या अनेक गोष्टींमुळे वादात सापडला होता. 2000 साली ब्रिटिश नर्स डोना राइटसह असलेल्या अनैतिक […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं.

क्रिकेटमधील महान क्रिकेटपटू ठरलेला वॉर्न खासगी आयुष्यात मात्र बराच वादग्रस्त ठरला होता.

आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना पळता भुई थोडी करणारा वॉर्न मात्र अश्लील मेसेज, फिक्सिंग, ड्रग्स, लाच यासारख्या अनेक गोष्टींमुळे वादात सापडला होता.

2000 साली ब्रिटिश नर्स डोना राइटसह असलेल्या अनैतिक संबंधाचा खुलासा झाला होता. त्याच्यावर नर्सला अश्लील मेसेज पाठविला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

2003 क्रिकेट विश्वचषकाच्या आधी वॉर्न हा डोपिंगमध्ये फेल झाला होता. ज्यामुळे त्याला टीममधून बाहेर काढण्यात आलं होतं.

2003 क्रिकेट विश्वचषकाच्या आधी वॉर्न हा डोपिंगमध्ये फेल झाला होता. ज्यामुळे त्याला टीममधून बाहेर काढण्यात आलं होतं.

2006 साली शेन वॉर्नचं नाव एका सेक्स स्कँडलमध्येही आलं होतं. एमटीव्ही प्रेझेंटर कॉरेली आणि एम्मा यांच्यासोबतचे त्याचे न्यूड फोटो देखील व्हायरल झाले होते.

शेन वॉर्नचे ब्रिटिश अभिनेत्री लिज हार्लेसोबत देखील संबंध होते. पण काही दिवसांनी लिजने असा आरोप केला होता की, शेन वॉर्नचे पॉर्न स्टारसोबत संबंध आहेत. त्यामुळे आपण त्याच्यापासून दूर जात आहोत.

2017 साली त्याच्यावर पॉर्न स्टार वलेरी फॉक्ससह लंडनच्या नाइट क्लबमध्ये मारहाण केल्याचा आरोप झाला होता. वलेरीने तेव्हा तिच्या डोळ्याला दुखापत झालेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

वॉर्नने आपल्या 145 सामन्यात टेस्ट करिअरमध्ये 708 विकेट घेतल्या होत्या.

शेन वॉर्नने आपला शेवटचा कसोटी सामना हा जानेवारी 2007 साली खेळला होता.

    follow whatsapp