IPL 2025 Video : स्टंपला बॅट लागूनही सुनील नरेनला OUT दिलं नाही! 'हा' नियम वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Sunil Narine, Indian Premier League 2025 : आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. कोलकाताच्या फलंदाजी दरम्यान सुनील नरेनने आक्रमक फटकेबाजी केली.

Sunil Narine Hit Wicket Video

Sunil Narine Hit Wicket Video

मुंबई तक

23 Mar 2025 (अपडेटेड: 23 Mar 2025, 07:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आयपीएच्या पहिल्या सामन्यात RCB ने कोलकाताचा केला पराभव

point

सुनील नरेनचा हिट विकेटचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल

point

पंचांनी सुनील नरेनला आऊट का दिलं नाही?

Sunil Narine, Indian Premier League 2025 : आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. कोलकाताच्या फलंदाजी दरम्यान सुनील नरेनने आक्रमक फटकेबाजी केली. परंतु, सामना सुरु असताना सुनीलने असं काही केलं, ज्यामुळे क्रिकेट विश्वात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. फलंदाजी दरम्यान 8 व्या षटकात सुनील नरेनची बॅट स्टम्पला लागून बेल्स पडल्या. त्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी पंचांकडे आऊटची अपिल केली. परंतु, पंचांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय की, हिट विकेट असूनही नरेनला आऊट का दिलं नाही..

हे वाचलं का?

मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या 35.11 च्या नियमानुसार, एखाद्या फलंदाजाला हिट विकेट तेव्हाच दिलं जाऊ शकतं, जेव्हा तो सामन्यात फटका मारण्याचा प्रयत्न करत असतो. या सामन्यात नरेन जेव्हा आऊट झाला, त्यावेळी कोणताही फटका मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. कारण रसिक सलामने जो चेंडू फेकला होता. तो चेंडू खूप उंचीवर  होता. पण नरेन तो चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी जेव्हा नरेनची बॅट खाली येत होती, तेव्हा नरेनची बॅट स्टम्पला लागली आणि बेल्स खाली पडल्या. 

हे ही वाचा >> Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओच्यामागे निघाली वेगळीच घटना

...तरच सुनील नरेन बाद झाला असता

हिट विकेट कोणत्या परिस्थितीत दिले जाते, असा सवाल तुम्हाला नक्कीच पडला असेल. रसिक सलामच्या त्या वाईड चेंडूवर नरेनने शॉट मारण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यादरम्यान नरेनची बॅट स्टप्मला लागून बेल्स खाली पडल्या असत्या, तरच नरेनला आऊट दिलं गेलं असतं. पण या सामन्यात नरेनने शॉट मारण्याच्या उद्देशाने बॅट स्टम्पला लावली नव्हती. म्हणूनच नरेनला नॉट आऊट दिलं. 

हे ही वाचा >> मोठी बातमी... सुशांत सिंहची हत्या झाली नाही, CBI ने दाखल केला क्लोजर रिपोर्ट

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करून 20 षटकात 8 विकेट्स गमावून 174 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून 16.2 षटकातच 177 धावा करून विजय मिळवला. त्यामुळे आरसीबीने पहिल्याच सामन्यात विजयाचा नारळ फोडल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

    follow whatsapp