टी 20 क्रिकेटमध्ये एबी डिविलियर्सनंतर मिस्टर 360 च्या नावाने ओळखला जाणारा टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav) फॉर्ममध्ये परतला आहे. सुर्यकुमार यादवने गुजरात विरूद्धच्या सामन्यात शतक ठोकलं होते. या शतकी खेळीत त्याने अनेक आक्रामक शॉर्टस खेळले होते. अशा एका शॉर्टची भूरळ क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरला (Sachin Tendulkar) पडली आहे. सुर्याच्या या भन्नाट शॉर्टबद्दल सचिन काय म्हणालाय? हे जाणून घेऊयात. (surykumar yadav hit six sachin tendulkar Shocking reaction viral in social media mumbai indians vs gujrat titans)
ADVERTISEMENT
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) 49 बॉलमध्ये 103 नाबाद धावा ठोकल्या होत्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले होते. सुर्याने या खेळीत एका पेक्षा एक हटके शॉट्स मारले होते. अशाच एक शॉट सचिन तेंडूलकरला (Sachin Tendulkar) आवडला आहे. या शॉर्टची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : गुजरातवर विजय, पण मुंबई प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार?
व्हिडिओत काय?
गुजरातकडून मोहम्मद शमी 19 वी ओव्हर टाकायला आला होता. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर सुर्याने भन्नाट सिक्स मारला होता.सुर्याच्या बॅटचे तोंड समोरच होते, मात्र बॉल येताच त्याने बॅट फिरवली आणि थर्ड मॅनच्या दिशेने भन्नाट सिक्स मारला. या सिक्सचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सचिन तेंडूलकरची (Sachin Tendulkar) रिअॅक्शन कैद झाली आहे. डग आऊटमध्ये बसून सचिन तेंडूलकर या शॉर्टची प्रॅक्टीस करताना दिसला आहे.
सचिन तेंडूलकर काय म्हणाला?
या सामन्यानंतर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सुर्यकुमार यादवची प्रशंसा केली.सुर्याने आकाशाला चमकवून टाकले. सुर्याने त्याच्या खेळीत अनेक मोठे शॉट्स खेळले. पण जो सिक्स त्याने थर्डमॅनच्या दिशेने मारला तो एकदमच वेगळा होता. ज्या प्रकारे त्याने बॅटला थर्डमॅनच्या दिशेने खोलून सिक्स मारला. हा कमालीचा शॉट होता. हा खुप कठीण शॉट होता आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज अशा शॉट खेळू शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी प्रशंसा केली.
हे ही वाचा :…तर रोहित शर्मा बाद झालाच नसता, 3M चा नियम काय सांगतो?
असा रंगला सामना
सुर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) या सामन्यात 103 धावांची खेळी करून आयपीएलच्या करिअरमधल पहिलं शतक ठोकलं. सुर्याच्या या खेळीच्या बळावर मुंबईने गुजरातसमोर 218 धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करायला उतरलेला गुजरात संघ 8 विकेट गमावून 191 धावापर्यंत मजल मारू शकली. त्यामुळे मुंबईने गुजरातचा 27 धावांनी पराभव केला. गुजरातकडून राशीद खानने बॉलिंग आणि बॅटींगमध्ये कमाल केली होती. राशीदने बॉलिंग करताना 4 विकेट घेतले तर बॅटींग करताना 32 धावात 79 धावा केला. या खेळीत त्याने 10 षटकार आणि 3 चौकार लगावले.
ADVERTISEMENT