भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधली लढत किती रंगतदार होते हे सर्वांना माहिती आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये आता बाय-लिट्रल सिरीज खेळवल्या जात नाहीत. आयसीसीच्या स्पर्धांव्यतिरीक्त हे दोन संघ समोरासमोर येत नाहीत. २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान टी-२० विश्वचषकाच्या निमीत्ताने समोरासमोर येतील.
ADVERTISEMENT
यानिमीत्ताने आज आपण एक असा किस्सा जाणून घेणार आहोत की जिथे टीम इंडियाने ठरवून काहीही झालं तरीही पाकिस्तानला जिंकू द्यायचं नाही असा पण केला आणि सरतेशेवटी तो खरा करुन दाखवला.
T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव
ही गोष्ट आहे २०११ च्या वन-डे विश्वचषकाची. भारतीय संघासाठी ही स्पर्धा महत्वाची होती. २८ वर्षांनंतर भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्याची संधी आली होती….आणि सर्वांना ज्याची अपेक्षा होती तेच झालं. अंतिम फेरीत प्रवेश करण्याआधी भारतासमोर आव्हान आलं ते पाकिस्तानचं. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला सामना म्हटला की दोन्ही संघांवर तेवढचं टेन्शन असतं. परंतू त्यावेळी भारतीय संघाला पाकिस्तानला हरवणं खूप महत्वाचं होतं.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की पाकिस्तानला हरवायचच असा पण त्यावेळी भारतीय संघाने का बरं केला असेल?? तर या मागचं उत्तर आहे २६/११ चा अतिरेकी हल्ला. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग जगजाहीर होता. २०११ च्या वर्ल्डकपची फायनल ही मुंबईत वानखेडे मैदानावर खेळवली जाणार होती. यासाठी दोन्ही संघाची सोय ही मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय संघात अशी भावना निर्माण झाली होती की ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला तिकडे आपण पाकिस्तानच्या संघाला पाय ठेवू द्यायचा नाही.
टीम इंडियाचे तत्कालीन मेंटल हेल्थ आणि फिटनेस कोच पॅडी अपटन यांनी एका पेपरला दिलेल्या मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं जे द्वंद्व आहे ते प्रेक्षकांसाठी जास्त असतं, खेळाडूंमध्ये त्या पद्धतीची आक्रमक आणि उग्र भावना नसते. याला कारण म्हणजे प्रत्येक खेळाडू समोरच्या खेळाडूला ओळखत असतो. आमच्यासाठी तो एक साधारण सामना होता, त्यासाठी आम्हाला दुसऱ्या कोणत्याही प्रेरणेची गरज नव्हती. त्यावेळी भारत-पाक सामन्यावर काही प्रमाणात राजकीय दबावही होता. ही गोष्ट कोणीही बोलून दाखवली नाही पण प्रत्येकाला मनातून माहिती होतं की जर भारत ही मॅच हरला तर पाकिस्तानचा संघ मुंबईत जाईल आणि ताज हॉटेलमध्ये थांबेल, जिथे अतिरेक्यांनी हैदोस घातला होता. त्यामुळे आमच्यासाठी याचा अर्थ खूप साधा आणि सोपा होता की पाकिस्तानने हा सामना जिंकून मुंबईत ताज हॉटेलमध्ये थांबणं हे योग्य ठरलं नसतं. म्हणूनच भारताचा संघ त्या सामन्यात आपलं सर्वस्व झोकून खेळला.
पॅडी अपटन, टीम इंडियाचे तत्कालीन फिटनेस कोच
प्रत्यक्ष सामन्यात झालंही तसंच ज्याची सर्वांना अपेक्षा होती. पहिल्यांदा बॅटींग करताना भारताने सचिन तेंडुलकरच्या ८५ धावांच्या खेळीवर २६० धावांपर्यंत मजल मारली. यानंतर बॉलिंगमध्ये झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन आणि युवराज यांनी पाकिस्तानता करेक्ट कार्यक्रम करत आपण केलेला निश्चय खरा करुन दाखवला.
T-20 World Cup : भारत पाकिस्तानचा सामनाच करु शकत नाही, अब्दुल रझाकने टीम इंडियाला डिवचलं
ADVERTISEMENT