IND vs PAK Match LIVE Score Update : ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये, 9 जून (रविवार) रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात जबरदस्त सामना रंगला. नॅसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी 120 धावांचे लक्ष्य होते, मात्र सात गडी गमावून त्यांना केवळ 113 धावाच करता आल्या. T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्धच्या आठ सामन्यांमधला हा सातवा विजय ठरला. (T20 worldcup 2024 ind vs pak match live score hardik pandya jasprit bumbrah india vs pakistan highlights)
ADVERTISEMENT
या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या होते. जे गेम चेंजर ठरले. एकवेळ अशी होती जेव्हा पाकिस्तानचा स्कोर दोन विकेटवर 72 धावा होत्या, पण त्यानंतर भारतीय गोलंदाज पुन्हा जोमाने खेळू लागले. जसप्रीत बुमराहने 4 षटकात अवघ्या 14 धावा देत 3 विकेट घेतल्या.
हार्दिक पंड्यानेही फखर जमान आणि शादाब खानला बाद करून महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीपनेच सामन्यातील शेवटचे षटक टाकले. ज्यामध्ये पाकिस्तानला 18 धावा करायच्या होत्या.
हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर भ्याड दहशतवादी हल्ला,10 जणांचा मृत्यू!
यापूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची विकेट पडली. नसीम शाहच्या चेंडूवर 4 धावा करून कोहली आउट झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर आउट झाला. रोहितने 13 धावा केल्या. यानंतर अक्षर पटेल आणि ऋषभ पंत या डावखुऱ्या फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 धावा जोडून डाव सांभाळला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पटेलला नसीमने बोल्ड केले.
भारताने 30 धावांत 7 विकेट गमावल्या
अक्षर पटेल बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. एकवेळ अशी होती जेव्हा भारताची धावसंख्या तीन विकेटवर 89 धावा होती आणि पुढे चांगली धावसंख्या करण्यात यश मिळेल असे वाटत होते, पण यावेळी पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार कमबॅक करत भारताला सतत धक्के दिले. भारताने 30 धावांत 7 विकेट गमावल्या.
हेही वाचा : PM Modi new cabinet minister list 2024 : असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी
भारतीय संघ केवळ 19 षटके खेळू शकला आणि 119 धावा केल्या. ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. भारताकडून ऋषभ पंतने 31 चेंडूत 6 चौकारांसह सर्वाधिक 42 धावा केल्या. अक्षर पटेलने 18 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या, तर पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि नसीम शाहने प्रत्येकी 3 विकेट घेतले. तर मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या.
ADVERTISEMENT