EngW vs IndW, 2nd T20I: महाराष्ट्राच्या मुलीचा इंग्लंडमध्ये डंका, इंग्लंडला लोळवलं

मुंबई तक

• 03:33 AM • 14 Sep 2022

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधानानं ५३ चेंडूत ७९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. या विजयासोबत भारतीय संघानं इंग्लंडसोबतची मालिका बरोबरीत आणली आहे. विजयासाठी १४३ धावांची गरज असताना कर्णधार हरमनप्रीत कौर २२ चेंडूत २९ करत नाबाद राहिली. भारतानं ३ षटकं शिल्लक ठेवत विजय मिळवला. फ्रेया केम्पच्या अर्धशतकानं इंग्लंडला तारलं 17 […]

Mumbaitak
follow google news

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधानानं ५३ चेंडूत ७९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. या विजयासोबत भारतीय संघानं इंग्लंडसोबतची मालिका बरोबरीत आणली आहे. विजयासाठी १४३ धावांची गरज असताना कर्णधार हरमनप्रीत कौर २२ चेंडूत २९ करत नाबाद राहिली. भारतानं ३ षटकं शिल्लक ठेवत विजय मिळवला.

हे वाचलं का?

फ्रेया केम्पच्या अर्धशतकानं इंग्लंडला तारलं

17 वर्षीय फ्रेया केम्पच्या शानदार अर्धशतकामुळे इंग्लंडने 10 व्या षटकात 54/5 वरून 142/6 पर्यंत मजल मारली. प्रेया T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारी सर्वात तरुण महिला फलंदाज ठरली आहे. परंतु गोलंदाजीत प्रेया चांगलाच मार पडला. शफाली वर्मा (17 चेंडूत 20) आणि स्मृती मानधना 35 चेंडूत 55 धावांची सलामी देत ​​तिच्या एका षटकात 19 धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटी शफालीला सोफी एक्लेस्टोनने झेलबाद केले, परंतु मानधनाने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

सामन्यानंतर स्मृती मंधाना काय म्हणाली?

“गेल्या सामन्यानंतर आम्हाला मजबूत पुनरागमन करून मालिकेत बरोबरी आणायची होती. चुकीचा शॉट खेळून बाद होऊ नये यासाठी मी स्वत:वरती ताबा ठेवत होते. फलंदाजी चांगली झाली, खेळपट्टी चांगली होती. मला माझा टच परत सापडला आहे. बॉलला मला हवे तसे टायमिंग करत आले. सलामवीर म्हणून संघाला चांगली सुरुवात करुन देणे गरजेचे असते.” असे मंधाना सामन्यानंतर म्हणाली.

“मी योगदान दिल्याबद्दल आनंदी आहे. गोलंदाजांवरती आणि वातावरण कसं आहे यावर अवलंबून असते. शफाली वर्मा गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते, पण तिला माझी ताकद आणि तिची ताकद माहीत आहे, म्हणून आम्ही वेगवेगळ्या गोलंदाजांना लक्ष्य करतो. अशी मंधाना पुढे म्हणाली.

काय म्हणाली हरमनप्रीत कौर?

कर्णधार हरमनप्रीतही दुसऱ्या टी-20 सामन्यात तिच्या संघाच्या प्रदर्शनामुळे खूश होती. “नक्कीच, आज आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आम्ही डरहममध्ये सामना गमावल्याच्या गोष्टींवर चर्चा केली आणि ती प्रत्यक्षात आणली. आमच्याकडे फलंदाजांसाठी योजना आहेत, ते अंमलात आणणे महत्त्वाचे आहे,” असे हरमनप्रीत म्हणाली.

    follow whatsapp