IPL 2021 साठी BCCI दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड दौऱ्याचा बळी देणार?

मुंबई तक

• 09:00 AM • 26 May 2021

आयपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआयने जय्यत तयारी सुरु केली असून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धा मध्यावधीमध्ये स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयला सुमारे अडीच हजार कोटीचा फटका बसला आहे. हा भरुन काढण्यासाठी बीसीसीआय युएईमध्ये ही स्पर्धा भरवण्याच्या विचारात आहे. परंतू यासाठी बीसीसीआय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धचा दौरा रद्द करण्याचे संकेत मिळत […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआयने जय्यत तयारी सुरु केली असून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धा मध्यावधीमध्ये स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयला सुमारे अडीच हजार कोटीचा फटका बसला आहे. हा भरुन काढण्यासाठी बीसीसीआय युएईमध्ये ही स्पर्धा भरवण्याच्या विचारात आहे. परंतू यासाठी बीसीसीआय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धचा दौरा रद्द करण्याचे संकेत मिळत आहेत.

हे वाचलं का?

IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी BCCI ने शोधला नवीन पर्याय

टी-२० वर्ल्डकपआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. परंतू सध्याच्या परिस्थितीमध्ये ही स्पर्धा बीसीसीआयला रद्द करावी लागेल असं चित्र दिसतंय. “सध्याच्या घडीला ही मालिका रद्द करावी लागेल. टी-२० वर्ल्डकपआधी सराव म्हणून आयपीएलसारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. आयपीएलची फायनल झाल्यानंतर १० दिवसांमध्ये टी-२० वर्ल्डकप सुरु होणार आहे, त्यामुळे यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सिरीज खेळवली जाईल.” BCCI च्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना माहिती दिली.

कोरोनाविरुद्ध लढाईत BCCI ही मैदानात, २ हजार Oxygen Concentrators करणार दान

ही मालिका रद्द झाल्यास २०२२ मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेल्यानंतर एक सामना अधिक खेळेल असेही संकेत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले आहेत. याचसोबत घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिकाही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. परंतू याचा निर्णय बीसीसीआय आता घेणार नसून टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल अंतिम निर्णय झाला की बीसीसीआय याबद्दल निर्णय घेईल.

    follow whatsapp