इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी सज्ज झालेल्या टीम इंडियासाठी एक दुर्दैवी बातमी आली आहे. सलग दुसऱ्यांदा भारतीय संघात निवड झालेला लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्ट फेल झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधीचं सोनं करुन चर्चेत आलेला टी. नटराजनच्याही खांद्याला दुखापत झालेली आहे…ज्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडियात जॉईन होण्याआधी वरुण चक्रवर्ती आणि टी. नटराजन यांनी बंगळुरुच्या NCA मध्ये फिटनेस टेस्ट घेण्यात आली. ज्यात वारंवार संधी देऊनही चक्रवर्ती फेल झाला. तर टी. नटराजनच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यालाही अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाहीये. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही वरुणची भारतीय संघात निवड झाली होती. परंतू खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातलं स्थान गमवावं लागलं. त्याच्या जागेवर नटराजनला संधी मिळाली होती.
ICC Player of The Month : रविचंद्रन आश्विन पुरस्काराचा मानकरी
यानंतरच्या काळात चक्रवर्ती खांद्याच्या दुखापतीमधून सावरला होता. परंतू फिटनेस टेस्ट पास करण्यात चक्रवर्तीला अपयश आलं. त्यामुळे चेतन शर्मा यांच्या निवड समितीने कोणत्या आधारावर वरुण चक्रवर्तीची भारतीय संघात निवड केली असा प्रश्न आता विचारला जात आहे.
BLOG : दृष्ट लागण्याजोगे सारे…
ADVERTISEMENT