Video : इंदिरानगर का गुंडा हू मै…शांत आणि संयमी राहुल द्रविड जेव्हा भडकतो

मुंबई तक

• 05:34 AM • 10 Apr 2021

The Wall या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडची ओळख एक शांत आणि संयमी प्लेअर म्हणून सर्वांना आहे. परंतू Cred या कंपनीच्या एका जाहीरातीमध्ये राहुल द्रविडच्या शांत आणि संयमी स्वभावाला छेद देऊन त्याचा रुद्रावतार कसा असतो हे दाखवण्यात आलंय. ज्यात राहुल ट्रॅफिकमध्ये इतरांशी भांडताना, बॅट हातात घेऊन आरसा तोडताना दाखवला आहे. सोशल मीडियावर राहुलची […]

Mumbaitak
follow google news

The Wall या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडची ओळख एक शांत आणि संयमी प्लेअर म्हणून सर्वांना आहे. परंतू Cred या कंपनीच्या एका जाहीरातीमध्ये राहुल द्रविडच्या शांत आणि संयमी स्वभावाला छेद देऊन त्याचा रुद्रावतार कसा असतो हे दाखवण्यात आलंय. ज्यात राहुल ट्रॅफिकमध्ये इतरांशी भांडताना, बॅट हातात घेऊन आरसा तोडताना दाखवला आहे. सोशल मीडियावर राहुलची ही जाहीरात चांगलीच व्हायरल होते आहे.

हे वाचलं का?

या जाहीरातीत राहुल हातात बॅट घेऊन इंदिरानगर का गुंडा हू मै…असं ओरडताना दाखवला आहे. क्रेडिट कार्डाचं बिल पेमेंट करणाऱ्या Cred या कंपनीची जाहीरात सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. पाहा या जाहीरातीची एक झलक आणि राहुल द्रविडचा रुद्रावतार…

पॉप्युलर स्टँडअप कॉमेडीयन तन्मय भट ने या जाहीरातीचं लेखन केलं आहे. अयप्पा के.एम. यांनी या जाहीरातीचं दिग्दर्शन केलं आहे. राहुल द्रविडचा हा रुद्रावतार पाहून भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीही चांगलाच आश्चर्यचकीत झाला असून ट्विटरवर त्याने राहुल सरांची ही बाजू मी कधीच पाहिली नव्हती असं म्हटलं आहे.

इतकच नव्हे तर ऑनलाइन फूड डिलेव्हरी करणाऱ्या झोमॅटोने राहुलच्या या जाहीरातीचा धागा पकडत…यापुढे इंदिरानगरमध्ये होम डिलेव्हरी उशीराने होऊ शकते कारण तिकडे एक गुंड रस्त्यावर फिरत आहे असं म्हटलंय.

२०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राहुल द्रविड कोचिंगकडे वळला. सर्वात आधी भारताच्या U-19 संघाला प्रशिक्षण दिल्यानंतर राहुल द्रविड सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चा संचालक म्हणून काम पाहतो आहे. आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत राहुल द्रविडने १६४ टेस्ट, ३४४ वन-डे आणि १ टी-२० मॅच खेळली आहे.

    follow whatsapp