कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) च्या सातव्या दिवशी कुस्तीचे सामने अचानक थांबवण्यात आले. बातमीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे. सामने थांबवल्यानंतर स्टेडियम रिकामे करण्यात आले आणि सर्व प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंनाही स्टेडियम सोडण्यास सांगण्यात आले. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने ट्विट करून याबाबत माहिती दिली.
ADVERTISEMENT
स्पीकर पडल्याने गोंधळ
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ट्विट करून लिहिले की, ‘सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही सामना काही काळासाठी थांबवत आहोत. परवानगी मिळताच आम्ही पुन्हा सामना सुरू करू. इंग्लंडच्या वेळेनुसार 12:15 वाजता सामने सुरू होतील. दिवसभरात पाच सामने झाले. भारताचा दीपक पुनिया 86 किलो गटात पहिला सामना जिंकून परतला होता. पुढचा सामना सुरू होण्याआधीच छतावरून एक स्पीकर मॅटजवळ पडला. यामुळे एकच गोंधळ उडाला.
यानंतर सर्व चाहते आणि खेळाडूंना परत जाण्यास सांगण्यात आले जेणेकरून संपूर्ण स्टेडियमची कसून तपासणी करता आली. स्पीकर मॅटच्या अगदी जवळ पडला होता. अशा परिस्थितीत आयोजकांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. एका प्रशिक्षकाने सांगितले की, आम्ही सर्व सुरक्षित आहोत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते कसून तपासणी करत आहेत.
भारताची कुस्तीत दमदार सुरुवात
भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 65 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ घेतला. त्याने सुरुवातीच्या फेरीत नॉराऊच्या लोव बिंगहॅमचा पराभव करून सहज विजयाची नोंद केली. गतविजेत्या बजरंगने प्रतिस्पर्ध्याला समजून घेण्यासाठी एक मिनिट घेतला आणि नंतर अचानक डाव टाकत सामना संपवला. नियाने 86 किलो गटातील सलामीचा सामना जिंकला आहे.
राष्ट्रकुल क्रीडा 2022 मधील भारताचे पदक विजेते
1. संकेत महादेव- रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)
2. गुरुराजा- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 61 किलो)
3. मीराबाई चानू- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 49 किलो)
4. बिंदियाराणी देवी- रौप्य (वेटलिफ्टिंग 55 किलो)
5. जेरेमी लालरिनुंगा – सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 67 किलो)
6. अचिंता शेउली – सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 73 किलो)
7. सुशीला देवी – रौप्य पदक (जुडो 48 किलो)
8. विजय कुमार यादव- कांस्य (जुडो 60 किलो
9. हरजिंदर कौर – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 71 किलो)
10. महिला संघ – सुवर्णपदक (लॉन बॉल्स)
11. पुरुष संघ – सुवर्णपदक (टेबल टेनिस)
12. विकास ठाकूर – रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 96 एमआय)
13 . रौप्य पदक (बॅडमिंटन)
14. लवप्रीत सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109 किलो)
15. सौरव घोषाल – कांस्य पदक (स्क्वॉश)
16. तुलिका मान – रौप्य पदक (जुडो)
17. गुरदीप सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109+ किलो)
18. तेजा शंकर- कांस्य पदक (उंच उडी)
19. मुरली श्रीशंकर- रौप्य पदक (लांब उडी)
20. सुधीर- सुवर्ण पदक (पॅरा पॉवरलिफ्टिंग)
ADVERTISEMENT