Shefali Verma : चर्चेत असणारी टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्मा कोण?

मुंबई तक

• 09:57 AM • 29 Jan 2023

Indian women under19 cricket team captain : भारताचा अंडर-19 महिला संघ (U19 women team) आज इतिहास रचत आहे (Make a history). ICC द्वारे प्रथमच आयोजित केल्या जाणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या (U19 T20 Women’s World cup Final) अंतिम फेरीत भारत आणि इंग्लंड एकमेकांशी भिडणार आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाची कमान 19 वर्षीय शेफाली वर्माच्या […]

Mumbaitak
follow google news

Indian women under19 cricket team captain : भारताचा अंडर-19 महिला संघ (U19 women team) आज इतिहास रचत आहे (Make a history). ICC द्वारे प्रथमच आयोजित केल्या जाणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या (U19 T20 Women’s World cup Final) अंतिम फेरीत भारत आणि इंग्लंड एकमेकांशी भिडणार आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाची कमान 19 वर्षीय शेफाली वर्माच्या (Shafali Verma) हाती आहे. शेफाली हे एक प्रसिद्ध नाव आहे कारण वयाच्या 15 व्या वर्षी तिने भारतासाठी (indian women cricket team) पदार्पण केले आणि तिच्या स्फोटक फलंदाजीने स्वत:चा ठसा उमटवला. (Who is indian U19 women cricket team captain Shefali Verma?)

हे वाचलं का?

महिला क्रिकेट टीमचा ऐतिहासिक विजय; 36 धावांवर टीम केली ऑलआउट, 6 ओव्हरमध्ये संपवला सामना

19 वर्षीय शेफाली वर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. शेफालीने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, ती वेगवान गोलंदाजी खेळण्याचा सराव कसा करायची, तिला बॉलच्या वेगाचा सामना करता यावा म्हणून तिच्यासमोर मुलांना बॉलिंग करायला लावले.

वयाच्या 15 व्या वर्षी पदार्पण

हरियाणाच्या रोहतकमधून आलेल्या शेफाली वर्माने वयाच्या 15 व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण केले. 2019 मध्ये, जेव्हा टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी तयारी करत होती, तेव्हा शेफालीने टीममध्ये प्रवेश केला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले. अवघ्या 15 व्या वर्षी या मुलीला टीम इंडियात जागा कशी मिळाली याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

Women U19 World Cup फायनलमध्ये आज भारताच्या मुली इंग्लंडला भिडणार

मात्र सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शेफालीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण शेफालीने पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर हल्ला चढवत मोठमोठ्या फटक्यांचा वर्षाव केला. यानंतर शेफालीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये चांगली फलंदाजी केली, पण टीम इंडियाला विजेतेपद मिळवता आले नाही.

मुलांसोबत सराव…

शेफालीने तिच्या तयारीबद्दल सांगितले की, जेव्हा ती टी-20 वर्ल्ड कपनंतर परतली तेव्हा तिला अनेक गोष्टींवर काम करायचे होते. अशा परिस्थितीत तिने प्रशिक्षकासोबत काम करण्यास सुरुवात केली, कारण मला एकदिवसीय संघात स्थान मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही वेगवान चेंडू खेळू लागलो, मुले 135-140 किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करायची, असं ती म्हणाली.

शेफालीच्या म्हणण्यानुसार, तिने क्रिकेटसोबतच फिटनेस आणि डाएटिंगवर भर दिला. यासोबतच तिने विश्वचषकातील पराभवातून सावरण्यासाठी अनेक सेशन केली. मॅचमध्ये फिट राहण्यासाठी शेफालीला तिचे आवडते पदार्थ सोडावे लागले. शेफालीने सांगितले की, आता ती पिझ्झा खात नाही, डोरेमन पाहत नाही कारण तिचे लक्ष फक्त क्रिकेटवर आहे.

असा आहे शेफालीचा विक्रम

शेफाली वर्माचा विक्रम पाहिला तर वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने 51 टी-20 सामन्यात 1231 धावा केल्या आहेत. शेफालीचा स्ट्राईक रेट 134.53 आहे, तिने T20 मध्ये 149 चौकार आणि 48 षटकार मारले आहेत. आता ती भारतासाठी केवळ टी-20 नाही तर एकदिवसीय आणि कसोटीही खेळली आहे. आतापर्यंत तिने 2 कसोटी सामने, 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तिच्या लहान वयामुळे, BCCI ने तिच्याकडे अंडर-19 T20 वर्ल्ड कपमध्ये संघाची कमान सोपवली आणि आता संघ इतिहास रचण्याच्या जवळ आहे.

    follow whatsapp