T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा संघ T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि 6 जून 2024 रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात सौरभ नेत्रावळकरने (Saurabh Netravalkar) त्यांची पहिलीच विकेट घेतली. टॉस जिंकत अमेरिकेने आधी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बाबर आझमचा संघ अमेरिकेने दिलेले 160 धावांचे लक्ष्य गाठू शकला नाही आणि सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला, जिथे पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या या दमदार विजयात मराठमोळा गोलंदाज सौरभ नेत्रावळकर याचं योगदान सर्वात महत्त्वाचं ठरत आहे. त्यानंतर हा सौरभ नेत्रावळकर आहे तरी कोण, याची चर्चा सुरु झाली आहे. चला तर मग त्याच्याविषयी जाणून घेऊयात. (who is saurabh netravalkar know his connection with india he took pakistans first wicket in the t20 world cup )
ADVERTISEMENT
सौरभ नेत्रावळकर आहे तरी कोण?
मुंबईत 9 ऑक्टोबर 1991 रोजी सौरभवचा जन्म झाला. त्यानंतर सौरभने एक वेगवान गोलंदाज म्हणून चांगले नाव कमावले. सौरभ नेत्रावळकरची गोष्ट जेवढी साधी आणि सिंपल आहे तेवढीच वेगळी पण आहे. त्यांने मुंबईच्या मैदानांवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली, शाळा- कॉलेज आणि अर्थात लोकलचा प्रवास सांभाळत आपल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीची त्याने एक वेगळीच छाप पाडली.
हेही वाचा : Uddhav Thackeray : शिंदेंचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात, भूकंप होणार?
भारतासाठी के. एल. राहुल, मयांक अग्रवाल, जयदेव उनाडकट यांच्यासोबत 19-वर्षांखालील विश्वचषक देखील सौरभ खेळला आहे. क्रिकेट खेळायचं म्हणून इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर मिळालेली नोकरी त्याने स्वीकारली नाही, पण मुंबई क्रिकेट संघात जागा नाही म्हणून तो पुन्हा शिक्षणाकडे वळला. सौरभ उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत आला आणि आजही त्याचं पोटा-पाण्याचं साधन म्हणजे त्याची सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी आहे.
मग ह्यात वेगळं काय आहे? अमेरिकेत गेल्यावर सौरभ पुन्हा क्रिकेटकडे वळला. जानेवारी 2018 मध्ये त्याने अमेरिकन संघात स्थान मिळवलं आणि आज तो 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी अमेरिकेकडून खेळत आहे. मुंबईकर सौरभ नेत्रावळकरने अमेरिकेकडून खेळताना पाकिस्तानला आता पहिला धक्का दिला आहे.
हेही वाचा : Ajit Pawar: बारामतीच्या निकालावर अजित पवारांची सर्वांत मोठी प्रतिक्रिया
T20 विश्वचषकाची दमदार सुरुवात सौरभने केली आहे. त्यामुळे आता यापुढे तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सौरभवर आता जबाबदारी वाढलेली असेल. अमेरिकेच्या संघाने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. हा विश्वास आता सौरभ वर्ल्ड कपमध्ये कसा राखतो हे पाहणं मजेशीर असणार आहे.
हेही वाचा : भाजप नेत्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा मोठा निर्णय, डावखरेंची चिंता मिटली!
भारतातील सौरभ नेत्रावळकरची क्रिकेट कारकीर्द
2010 मध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. सौरभने त्या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. त्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. सौरभ मुंबईसाठी रणजी ट्रॉफीही खेळला आहे. त्याने 2008-09 मध्ये कूचबिहार ट्रॉफीमध्ये 6 सामन्यात 30 विकेट घेतल्या होत्या. तसंच त्याने 2013-14 मध्ये मुंबईकडून कर्नाटकविरुद्ध एक तुफानी सामना खेळला होता.
क्रिकेटसोबत जपतो गायनाची आवड
सौरभ क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त त्याची गायनाची आवडही जपतो. सोशल मीडियावर तो अनेकदा त्याचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. या व्हिडीओंमध्ये सौरभ खासकरून मराठी गाणी गातो त्यामुळे चाहत्यांकडून त्याचं विशेष कौतुक होतं. अमेरिकेत राहूनही तो आपली मुळं विसरलेला नाहीये. गायन विश्वात मोठं नाव असलेले सलील कुलकर्णी यांनीही नुकतंच सौरभ नेत्रावळकरचा व्हिडीओ ट्वीट करत मनभरून कौतुक केलं आहे. ज्याची प्रचंड चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT