WPL 2023 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये फायनल लढत, कोण मारणार बाजी?

मुंबई तक

• 11:44 AM • 26 Mar 2023

WPL Final match between mumbai and delhi: महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात आज (26 मार्च) मुंबई इंडियन्सचा (MI) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होत आहे. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दोन्ही संघांची कामगिरी पाहता […]

Mumbaitak
follow google news

WPL Final match between mumbai and delhi: महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात आज (26 मार्च) मुंबई इंडियन्सचा (MI) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होत आहे. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दोन्ही संघांची कामगिरी पाहता जेतेपदाचा सामना खूपच रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. WPL 2023 : Mumbai Indians vs Delhi Capitals

हे वाचलं का?

Shafali Verma : चौकार-षटकारांची आतिषबाजी, WPLमध्ये शेफालीचा दिसला तुफानी अंदाज!

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्सला आतापर्यंत विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा स्थितीत महिला लीगच्या पहिल्याच सत्रात तिला चॅम्पियन बनून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाला महिला लीगमध्येही वर्चस्व राखण्याची संधी आहे.

हरमनप्रीतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

अंतिम फेरीत मुंबईला मोठी धावसंख्या करायची असेल, तर कर्णधार हरमनप्रीत कौरला चांगली खेळी खेळावी लागेल. त्याचबरोबर नेट सायबर-ब्रंटलाही महत्त्वाचे योगदान द्यावे लागेल. हरमनप्रीत कौरने स्पर्धेच्या सुरुवातीला तीन अर्धशतके झळकावली होती पण तिला तिचा फॉर्म कायम ठेवता आला नाही. हरमनने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सविरुद्ध केवळ 14 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सचा संघ एकेकाळी गुणतालिकेत अव्वलस्थानी होता, पण दिल्ली कॅपिटल्सने हळूहळू लय मिळवून मुंबईला गुणतालिकेत अव्वल स्थानावरून दूर केले. आतापर्यंत कर्णधार मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मारिजाने कॅप यांनी दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे.

WPL : पोरींनी पहिल्याच फटक्यात केली कमाल… IPL मध्ये दिग्गजांनाही नव्हतं जमलं

मॅथ्यूज आणि Nate Sciver-Brunt यांची दमदार कामगिरी

मुंबईकडे हेली मॅथ्यूजच्या रूपाने आणखी एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत 258 धावा करण्याव्यतिरिक्त 13 बळी घेतले आहेत. याशिवाय यास्तिका भाटियाने फलंदाजीत आक्रमक वृत्ती दाखवली आहे. नॅट स्कायव्हर-ब्रंटने बॅट आणि बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि आतापर्यंत टूर्नामेंटमध्ये 272 धावा करण्याव्यतिरिक्त 10 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईच्या गोलंदाजीचा विचार केला तर सायका इशाकने 15 विकेट घेत आपली योग्यता सिद्ध केली आहे. याशिवाय मुंबईकडे इसा वाँग (13 विकेट) आणि अमेलिया केर (12 विकेट) सारखे उत्कृष्ट गोलंदाज आहेत.

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगला WPL च्या पहिल्या सत्राचे विजेतेपद जिंकून आणखी एक ट्रॉफी आपल्या नावावर नोंदवायची आहे. लॅनिंगने गेल्या महिन्यात तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाला महिला T20 विश्वचषक जिंकून दिला होता. मेग लॅनिंगने WPL च्या चालू हंगामात सर्वाधिक 310 धावा केल्या आहेत. मारिजाने कॅप आणि एलिस कॅप्सीनेही चांगली कामगिरी केली आहे, पण अंतिम सामना असल्याने भारतीय खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, शिखा पांडे आणि राधा यादव यांनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

WPL: प्रचंड चर्चेत असलेली यास्तिका भाटिया आहे तरी कोण?

    follow whatsapp