ADVERTISEMENT
Gujarat Giants संघाने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या सीजनसाठी कर्णधाराची घोषणा केली आहे.
यावर्षीच्या WPL सीजनमध्ये ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी गुजरात जायंट्सची कर्णधार असणार आहे.
गुजरात जायंट्सने दोन कोटी रुपये खर्च करून बेथ मुनीला आपल्या संघात घेतलं आहे.
त्याचबरोबर भारताची अष्टपैलू खेळाडू स्नेह राणाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बेथ मुनीने नुकतेच, ऑस्ट्रेलिया संघासोबत महिला T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात बेथ मुनीने नाबाद 74 धावांची खेळी केली.
बेथ मुनीने ऑस्ट्रेलियासाठी एकूण चार विश्वचषक जिंकले आहेत.
ADVERTISEMENT