भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाचे परदेशी कोच मुराद गैदारोव्ह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रेफ्रीवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली गैदारोव्ह यांना ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर करण्यात आलंय. दीपक पुनियाला कांस्यपदकाच्या लढतीत सॅन मारिनोच्या अमीन माईल्स नझीमकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
ADVERTISEMENT
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गैदारोव्ह यांचं Accreditation रद्द केलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सेक्रेटरी जनरल राजीव मेहता यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. घडलेल्या प्रकारानंतर गैदारोव्ह यांना तात्काळ भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Tokyo Olympics : पहिल्याच प्रयत्नात रवी कुमारचं ‘चंदेरी’ यश
२०१८ साली दीपक पुनियाने ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पिअनशीप जिंकल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने दीपक पुनियासाठी गैदारोव्ह यांनी नेमणुक केली होती. २०१८ पासून दीपक गैदारोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो आहे. ४२ वर्षीय गैदारोव्ह हे बेलारुसचे असून त्यांनी २००८ साली बिजींग ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे.
८६ किलो वजनी गटात रेपिचाज राऊंडमध्ये ब्राँझ पदकासाठी खेळणाऱ्या दीपक पुनियावर सॅन मरीनोच्या अमीन माईल्स नाझेमने ४-२ च्या फरकाने मात केली. अखेरच्या क्षणांमध्ये बचावात केलेला ढिसाळपणा दीपक पुनियाला चांगलाच महाग पडला. दुसऱ्या सत्रात दीपक पुनियाने तीन मिनीटांच्या बाऊटमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वेळ खर्च करुन सामना आपल्या बाजूने झुकवला. परंतू अखेरच्या काही सेकंदांमध्ये सॅन मरीनेच्या अमीनने दीपक पुनियाच्या पायाची पकड घेत उलटफेर केला. मोक्याच्या क्षणी दोन गुणांची कमाई करत अमीनने सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. भारताने या निर्णयाला आव्हान दिलं, परंतू हे आव्हान न टिकल्यामुळे सॅन मरीनोच्या खेळाडूला आणखी एक गुण बहाल करत ४-२ असा निकाल जाहीर करण्यात आला.
ADVERTISEMENT