Rohit Sharma, Two Spinners in WTC Final 2023 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या चुरशीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची रणनीती काय असेल? यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने उत्तर दिलं. रोहितने दोन फिरकीपटूंना खेळवण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT
रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, “दोन फिरकीपटूंना खेळवायचं की नाही याचा निर्णय आम्ही उद्या (७ जून) घेऊ. कारण हे पाहावं लागेल की इथली खेळपट्टी रोज बदलतेय. संघातील सर्व 15 खेळाडूंनी तयार राहायला हवे. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याचे आणि जास्तीत जास्त सामने आणि ही चॅम्पियनशिप जिंकण्याचे काम मिळाले आहे. त्यामुळेच आम्ही खेळतो, जेणेकरून आम्हाला काही विजेतेपदे आणि मोठी मालिका जिंकता येईल.”
गिलला सल्ल्याची गरज नाही -रोहित शर्मा
रोहितला शुबमन गिलबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, त्याला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवेल अशी आशा टीमला आहे. शुभमन हा खूप आत्मविश्वास असलेला खेळाडू आहे, असंही रोहितने सांगितलं.
मी फारसा विचार करत नाहीये
यावेळी रोहित म्हणाला की, क्रिकेट तज्ज्ञ अनेक गोष्टींबद्दल बोलतात, पण कोणत्या संघाने खेळाडूंचा चांगला वापर केला आहे, हे पाच दिवसांनंतरच कळेल. प्रथमच आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत टीम इंडियाच्या कर्णधार असलेल्या रोहित शर्माने सांगितले की, ‘मी या सामन्याबद्दल फारसा विचार करत नाहीये. खूप विचार करून स्वत:वर जास्त दडपण घ्यायचे नाही.”
हेही वाचा >> Ajinkya Rahane WTC Final : ‘अजिंक्य’साठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती!
WTC फायनलसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएस भरत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट , उमेश यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक).
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
हेही वाचा >> WTC Final ड्यूक बॉलने खेळवणार, पण टीम इंडियाला SG बॉलची सवय
ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मायकेल नेसर , स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
स्टँडबाय खेळाडू: मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड (ओव्हल)
– भारत – 14 कसोटी, 2 विजय, 5 पराभव, 7 अनिर्णित
– ऑस्ट्रेलिया – 38 सामने, 7 विजय, 17 पराभव, 14 अनिर्णित
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी रेकॉर्ड
एकूण 106 सामने – भारताने 32 जिंकले, ऑस्ट्रेलियाने 44 जिंकले, 29 अनिर्णित, 1 बरोबरीत
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे वेळापत्रक
– तारीख- 7 ते 11 जून, 2023
स्थळ – ओव्हल ग्राउंड, लंडन
संघ- भारत आणि ऑस्ट्रेलिया
राखीव दिवस – 12 जून
ADVERTISEMENT