टीम इंडियाच्या स्फोटक बॅट्समनपैकी एक अशी ओळख असलेल्या युसूफ पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. युसूफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही घोषणा केली आहे. २००७ टी-२० वर्ल्डकप आणि २०११ वर्ल्ड कपमध्ये युसूफ पठाण भारतीय संघाचा हिस्सा होता.
ADVERTISEMENT
आतापर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी युसूफने आपला परिवार, मित्र, फॅन्स, संघातील सहकारी आणि सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत. ज्या दिवशी मी पहिल्यांदा टीम इंडियाची जर्सी घातली तो दिवस मला आजही आठवतोय. त्या दिवशी मी फक्त ती जर्सी घालत नव्हतो तर त्यावेळी माझा परिवार आणि लाखो चाहत्यांच्या अपेक्षा माझ्या खांद्यावर घेऊन मैदानावर उतरत होतो.
लहानपणापासून माझं आयुष्य हे क्रिकेटशीच निगडीत राहिलेलं आहे. पण आजचा दिवस हा माझ्यासाठी वेगळा आहे. मी आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतो आहे, असं म्हणत युसूफने सर्वांचे आभार मानले आहेत. युसूफने आपल्या छोटेखानी कारकिर्दीत ५७ वन-डे आणि २२ टी-२० सामने खेळले आहेत.
युसूफ पठाणसोबत कर्नाटकचा अनुभवी फास्ट बॉलर विनय कुमारनेही सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. विनय कुमारने १ टेस्ट, ३१ वन-डे आणि ९ टी-२० मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
ADVERTISEMENT