Viral News: भलताच पुरूष होता 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीला समजलं पत्नी तर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

After 16 years of marriage we realized that the father of four daughters is someone else incident China
After 16 years of marriage we realized that the father of four daughters is someone else incident China
social share
google news

Viral News: घटस्फोटासंदर्भातील एक बातमी सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाली होती. त्यामध्ये नवऱ्याने आपल्या बायकोबाबत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळी अनेक लोकांना त्याचा धक्का बसला. नवऱ्याने सांगितले की, लग्नाला 16 वर्षे झाली होती व त्यांना चार मुलीसुद्धा (Daughter) आहेत, मात्र त्याला नंतर हे समजलं की, त्या चार मुलींचा बाप तो नाही दुसराच कोणी तरी आहे. कारण त्याला माहिती होतं की, त्याची बायको त्याला धोका देत होती, आणि फसवत होती. त्यासंदर्भातील त्याने सगळे पुरावेच त्याने न्यायालयात बायकोविरोधात (Wife) सादर केले होते. हे प्रकरण घडलं आहे चीनमधील (China) जियांग्शी प्रांतातील. मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली होती.

ADVERTISEMENT

बायकोविरोधात पुरावे

चेन जिशियान नावाच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या विरोधात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्याच्या पत्नीचे नाव यू असल्याचेही सांगण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार चेन आणि त्याच्या वकिलांनी न्यायालयात काही पुरावे सादर केले होते. त्यामध्ये म्हटले होते की, गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये चेनच्या बायकोने नोव्हेंबरमध्ये शहराबाहेर जाऊन एका मुलीला जन्म दिला होता.

रुग्णालयामुळे प्रकरण आलं बाहेर

रुग्णालयातील  कागदपत्रावरून चेनला समजलं की, तिने जेव्हा बाळाला जन्म दिला होता, त्यावेळी तिथे वू नावाचा कोणीतरी व्यक्ती तिथे उपस्थित होता. चेनलाही त्याच्यावर संशयही होता की, त्याच्याबरोबर आपल्या पत्नीचे अफेअर चालू आहे. ही घटना आता त्या दोघांपूरती मर्यादित राहिली नाही तर त्यांच्यावर आता सोशल मीडियावरही जोरदार चर्चा चालू आहे. ही घटना सगळ्यांना जेव्हा समजली तेव्हा चीनमधील लोकं आता त्याला देशातील सगळ्यात दुर्देवी आणि दुःखी माणूस म्हणत आहेत. तर आणखी एक धक्कादायक गोष्ट ही आहे की, चेनच्या आणखी तीन मुली ज्या 2008, 2010 आणि 2018 मध्ये जन्मल्या होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बायकोचा प्रियकर

तर त्या मुलींचा बापही वू नावाचाच व्यक्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चेन आणि त्याच्या बायकोमध्ये 2022 पासून वादाला सुरुवात झाली. त्यावेळी चेनच्या लक्षात आलं की, त्याची बायको त्याला धोका देते आहे. त्यामुळे त्यानेही फेब्रुवारी 2022 पासून त्याची बायको यूच्या पाळतीवर राहून त्याने तिच्यावर लक्ष ठेवून राहिला. त्यानंतर रात्रीच्या वेळी एकदा त्याची बायको दुसऱ्याच एका व्यक्तीबरोबर एका हॉटेलमध्ये त्याला सापडली.

हे ही वाचा >> Sharad Mohol : ‘… तर शरद मोहोळची हत्या झाली नसती, ‘त्या’ दोघांबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती

मुलांची डीएनए टेस्ट

चेनला त्याच्या बायकोबाबत संशय येऊ लागला त्यावेळेपासून त्याला वाटू लागले की, त्याची सगळ्यात लहान असलेली मुलगी ही त्याची नव्हे. कारण ती त्याच्यासारखी अजिबात दिसत नव्हती.त्यामुळे त्याने तिचा डीएनए टेस्ट करण्याचा विचार केला, आणि त्यावेळी त्याला जो संशय वाटत होता तोच खरा निघाला, आणि ती मुलगी त्याची नव्हती हेच सिद्ध झाले.

ADVERTISEMENT

सासरच्याबरोबर वाद

त्यानंतर चेनने आपल्या बायकोबद्दल जे काही सांगायचे होते, ते त्याने जाऊन तिच्या माहेरी जाऊन सांगितले. त्यावेळी त्याची सासू त्याच्याबरोबर वाद घालू लागली. ते वाद चालू असतानाच त्याच्या सासूला धक्का बसला आणि ती खाली पडली. सासू खाली पडल्यामुळे त्याचा सासरा आणि त्याची बायकोही त्याच्या अंगावर धाऊन आली. या घटनेमुळे चेनच्या वडिलांना मानसिक धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

ADVERTISEMENT

मानसिक त्रास

सासरकडील नातेवाईकांबरोबर वाद झाल्यानंतर चेनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी चेन म्हणाला की, कोणत्याही पुरुषाला आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेविषयी आणि आठवणींविषयी सगळ्यासमोर आणणं चुकीचं आहे, मात्र त्यावेळी मला त्याचा प्रचंड मानसिक त्रास झाला, कारण मला त्यावेळी समजलं होतं की, ही मुलं माझी नाहीत.

संगोपनासाठी खर्च मिळावा

हा सर्व प्रकार घडल्यानंतर चेनने आपल्या पत्नीला त्यांच्या मुलांच्या खऱ्या वडिलांबद्दल विचारले तेव्हा मात्र ती काहीच बोलली नाही. चेन सांगतात की, हे सगळं झालं असलं तरी त्याला त्या मुलांची खूप आठवण येते. त्यामुळे त्याने आता त्याच्या पत्नीला त्यांच्या मुलांचे पालकत्व मिळावे आणि त्यांनी त्यांच्या संगोपनासाठी केलेला खर्च मिळावा अशी त्याची इच्छा आहे. या प्रकरणी चेनची पत्नी यू म्हणते की, ही मुलं गेली कित्येक वर्षे त्यांना पप्पा म्हणतात. मात्र त्यांचा डीएनए चेक करणं म्हणजे ही प्राण्यांसारखी गोष्ट करणं झालं आहे. मात्र मला अजूनही असं वाटत नाही की, मी त्यांची फसवणूक केली आहे असं ती म्हणते. मात्र या सगळ्यात खरचं रक्ताचे नाते महत्वाचे आहे का असा सवालही तिने उपस्थित केला आहे.

हे ही वाचा >> आधी Love Marriage केलं, नंतर ‘तो’ आयुष्यात आला अन्…; हत्येची Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT