Bhagirath Bhalke : शरद पवारांचा सोलापुरातील नेता ‘केसीआर’ यांनी फोडला
पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT
Bhagirath Bhalke Latest News : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके पराभूत झाले. महाविकास आघाडी एकत्र असताना झालेल्या या पराभवानंतर शरद पवारांनी मोठा निर्णय घेतला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यासाठी शरद पवारांनी चांगला माणूस हेरला. शरद पवारांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या. अस्वस्थ असलेल्या भगीरथ भालकेंनी थेट नेताच बदलण्याचा निर्णय घेतला. (Bhagirath Bhalke will be joining Kcr’s Bharat Rashtra Samithi)
ADVERTISEMENT
पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भगीरथ भालके केसीआर यांच्या पार्टीत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. कारण भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत. केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवले आहे. मात्र सोलापूरमधील चिमणीमुळे विमान लँडिंग होण्यास काही अडचणी येत असल्याची माहिती स्वतः भालके यांनी ‘मुंबई Tak’ला दिली आहे. भालके यांच्या या निर्णयामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा हादरा समजला जात आहे.
हेही वाचा >> Thane : “…तर हा एकनाथ शिंदे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करेन”, मुख्यमंत्री गहिवरले
दरम्यान, या भेटीनंतर पक्ष प्रवेश करून भगीरथ भालके हे 2024 मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.
हे वाचलं का?
पाटलांचा प्रवेश आणि केसीआर यांचा भालकेंना फोन
शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेत जनता आपला पक्ष ही भूमिका जाहीर केली होती. मात्र आज किंवा उद्या सकाळी ते विमानाने हैदराबादला रवाना होणार आहेत.
राष्ट्रवादीला मोठा धक्का
दोनच दिवसांपूर्वी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे निमित्त साधून भगीरथ भालके यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यात त्यांनी विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले. पवारांच्या दौऱ्यानंतर अवघ्या एक महिन्यातच भालके तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षात जात असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT