औरंगजेब ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’वरून कोल्हापुरात ठिणगी, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज
कोल्हापुर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्याचबरोबर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या.
ADVERTISEMENT
Kolhapur news today : कोल्हापूरच्या शांततेला गालबोट लागलं. ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’वरून सुरू झालेला वाद हिंसक बनला आहे. व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचे फोटो लावून वादग्रस्त मजकूर लिहिल्याच्या प्रकरणानंतर जमावाने शहरातील वेगवेगळ्या भागात दगडफेक केली होती. काही ठिकाणी दोन्ही गट आमने-सामनेही आले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. त्यामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाविषयी व्हॉट्सअॅप स्टेटसला पोस्ट ठेवली होती. या पोस्टवरून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांच्या जमावाने लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्याच्या दारात गर्दी केली. त्यानंतर घोषणाबाजी केली. हा जमाव शहरातील टाऊन हॉल, बिंदू चौक, लक्ष्मी मंडई, अकबर मोहल्ला, मुस्लिम बोर्डिंग, सीसीआर रुग्णालय परिसरात गेला. तिथे दुकान, हातगाड्या आणि घरांवर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.
बुधवारी काय घडलं?
काल झालेल्या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक इथे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र या आंदोलन सुरू केलं. लव्ह जिहाद विरोधी घोषणा देत हिंदुत्वादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्याला आला आहे.
हेही वाचा >> ‘एकमेकांच्या पायात पाय घालून…’, सर्व जागा लढवण्याबद्दल शरद पवार काय बोलले?
पोलिसांकडून बळाचा वापर
हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर हिंसक झालेल्या जमावाने दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या.
हेही वाचा >> Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. आजपासून (7 जून) 19 जूनपर्यंत जमावबंदी (पाचपेक्षा अधिक लोक जमा होणे), मिरवणुका काढणे बेकायदा जमाव जमवणे तसेच सभा घेण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT